मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shikhar Dhawan: सीनियर खेळाडूंना पुन्हा विश्रांती, शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन?

Shikhar Dhawan: सीनियर खेळाडूंना पुन्हा विश्रांती, शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन?

Sep 11, 2022, 07:52 PM IST

    • Shikhar Dhawan captain vs South Africa odi series: T20 विश्वचषकापूर्वी वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे सामयांच्या मालिकेतून विश्रांती मिळू शकते. त्यामुळे शिखर धवन पुन्हा भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.
Shikhar Dhawan

Shikhar Dhawan captain vs South Africa odi series: T20 विश्वचषकापूर्वी वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे सामयांच्या मालिकेतून विश्रांती मिळू शकते. त्यामुळे शिखर धवन पुन्हा भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.

    • Shikhar Dhawan captain vs South Africa odi series: T20 विश्वचषकापूर्वी वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे सामयांच्या मालिकेतून विश्रांती मिळू शकते. त्यामुळे शिखर धवन पुन्हा भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.

T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासोबत घरच्या मैदानावर टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. T20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळू शकते. त्यामुळे सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सोबतच, व्हीव्हीएस लक्ष्मण हा देखील आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा हंगामी कोच म्हणून जबाबदारी सांभाळू शकतो. या काळात संघाची धुरा सांभाळू शकतो. दक्षिण आफ्रिकेसोबत टी-२० मालिकेव्यतिरिक्त भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे आणि वनडे मालिकेत धवन भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.

टी-२० विश्वचषकापूर्वी एकदिवसीय सामन्यांची मालिका होणे योग्य नाही

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला अशी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “होय, टी-२० विश्वचषकापूर्वी एकदिवसीय सामन्यांची मालिका होणे योग्य नाही. पण कधी कधी असं होतं. रोहित, विराट आणि टी-२० विश्वचषकासाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंना वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्यांना थोडा ब्रेक मिळेल. शिखर धवन वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे".

दक्षिण आफ्रिकेला ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान भारतात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. सोबतच आफ्रिकेचा संघ २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत भारतात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे.

तीन टी-20 सामन्यांची मालिका

पहिला T20I - २८ सप्टेंबर (त्रिवेंद्रम)

दुसरा T20I - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)

तिसरा T20I - ४ ऑक्टोबर (इंदूर)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका-

पहिला वनडे- ६ ऑक्टोबर (लखनौ)

दुसरा वनडे- ९ ऑक्टोबर (रांची)

तिसरा वनडे- ११ ऑक्टोबर (दिल्ली)

पुढील बातम्या