मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Steve Smith : स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर इतिहास रचला, कोहली-रूटला जमलं नाही ते करून दाखवलं!

Steve Smith : स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर इतिहास रचला, कोहली-रूटला जमलं नाही ते करून दाखवलं!

Jun 28, 2023, 08:21 PM IST

    • Steve Smith 9000 runs in test cricket : लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत स्टीव्ह स्मिथने एक विक्रम रचला आहे. स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावा (Fastest 9000 Runs in Test Cricket) करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
Steve Smith 9000 runs (Action Images via Reuters)

Steve Smith 9000 runs in test cricket : लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत स्टीव्ह स्मिथने एक विक्रम रचला आहे. स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावा (Fastest 9000 Runs in Test Cricket) करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

    • Steve Smith 9000 runs in test cricket : लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत स्टीव्ह स्मिथने एक विक्रम रचला आहे. स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावा (Fastest 9000 Runs in Test Cricket) करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

Steve Smith test record : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

वास्तविक, स्टीव्ह स्मिथच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. स्मिथने हा पराक्रम केवळ १७४ व्या डावात केला. 

फॅब फोरमधील खेळाडू जो रुट आणि विराट कोहलीलाही अशी कामगिरी करता आलेली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ९ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. त्याने १७२ कसोटी डावात ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. संघकारानंतर स्टीव्ह स्मिथ १७४ डावात ९ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.

कसोटीत सर्वात वेगाने ९ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर भारताचा राहुल द्रविड आहे. द्रविडने १७६ कसोटी डावात ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. 

सर्वात जलद ९ हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज

कुमार संगकारा (श्रीलंका) - १७२ डावात

स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - १७४ डावात

राहुल द्रविड (भारत) - १७६ डावात

ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) - १७७ डावात

रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - १७७ डावात

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघात एक बदल

बोलँडच्या जागी स्टार्क

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. कांगारू संघाने स्कॉट बोलँडच्या जागी मिचेल स्टार्कचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे स्टार्क पहिल्या कसोटीत संघाचा भाग नव्हता. स्टार्कच्या आगमनाने ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण खूपच मजबूत दिसत आहे.

मोईन अलीच्या जागी जोश टँग

इंग्लंडनेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. दुखापतग्रस्त मोईन अलीच्या जागी कर्णधार बेन स्टोक्सने २५ वर्षीय वेगवान गोलंदाज जोश टँगचा संघात समावेश केला आहे. टंगने यावर्षी आयर्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणातच ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता.

 

 

पुढील बातम्या