मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Steve Smith 100th Test : स्मिथच्या १०० व्या कसोटीत विक्रमांचा पाऊस पडणार, द्रविडला या बाबतीत मागे टाकणार

Steve Smith 100th Test : स्मिथच्या १०० व्या कसोटीत विक्रमांचा पाऊस पडणार, द्रविडला या बाबतीत मागे टाकणार

Jul 06, 2023, 12:59 PM IST

    • steve smith 100th test match : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच स्मिथ इतिहास रचणार आहे.
steve smith

steve smith 100th test match : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच स्मिथ इतिहास रचणार आहे.

    • steve smith 100th test match : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच स्मिथ इतिहास रचणार आहे.

eng vs aus ashes 2023 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (६ जुलै) अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथवर खिळल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. स्टीव्ह स्मिथ मैदानावर पाऊल ठेवताच केवळ इतिहासच रचणार नाही तर तो भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा अनोखा विक्रमही मोडेल.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

खरं तर, आज स्टीव्ह स्मिथ असा फलंदाज बनणार आहे, ज्याची १०० कसोटींमध्ये फलंदाजीत सर्वाधिक सरासरी असणार आहे. इतकेच नाही तर स्टीव्ह स्मिथ असा खेळाडू बनेल ज्याच्या नावावर १०० कसोटी खेळल्यानंतर सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा विक्रम असेल.

१०० कसोटीनंतर सर्वोत्तम सरासरी

स्टीव्ह स्मिथ १०० वी कसोटी खेळण्यासाठी हेडिंग्लेच्या मैदानावर उतरेल, तेव्हा त्याची फलंदाजीची सरासरी ५९.५६ असेल. यापूर्वी १०० कसोटी सामने खेळल्यानंतर सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता. राहुल द्रविड जेव्हा १०० वा कसोटी सामना खेळला, तेव्हा त्याची फलंदाजीची सरासरी ५८.१६ होती.

दरम्यान, लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात स्मिथने आणखी ६७ धावा केल्या असत्या तर ६० पेक्षा जास्त फलंदाजीच्या सरासरीने १००वी कसोटी खेळणारा तो पहिला फलंदाज ठरला असता.

१०० कसोटी आधीच ९ हजार धावा

स्टीव्ह स्मिथ हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने १०० कसोटी खेळण्यापूर्वीच ९ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत ९९ कसोटीत ९११३ धावा केल्या आहेत. स्मिथने १०० कसोटी सामने खेळण्यापूर्वी ३२ शतके झळकावली आहेत. १०० कसोटी सामने खेळून आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला ३० पेक्षा जास्त शतके झळकावता आलेली नाहीत.

स्टीव्ह स्मिथ त्याच्या १०० व्या कसोटीत आणखी एक संस्मरणीय खेळी खेळेल अशी अपेक्षा आहे. अॅशेसदरम्यानही स्मिथ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. लॉर्ड्स कसोटीत स्मिथने शानदार शतक झळकावले होते. एवढेच नाही तर स्मिथने मागील तीन कसोटीत दोन शतके झळकावली आहेत. स्मिथच्या उत्कृष्ट खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने WTC फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता.

पुढील बातम्या