मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsSA T20: दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल, टीम इंडिया बदला घेण्याच्या तयारीत

INDvsSA T20: दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल, टीम इंडिया बदला घेण्याच्या तयारीत

Jun 02, 2022, 03:18 PM IST

    • भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-२० सामन्यात पराभूत केले तर टीम इंडिया सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ होईल. टीम इंडियाने मायदेशात झालेल्या मागील तिन्ही टी-२० मालिका सलग जिंकल्या आहेत. भारताने तिन्ही मालिकेत विरोधी संघांना क्लिन स्वीप दिला आहे.
भारत वि. दक्षिण आफ्रिका

भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-२० सामन्यात पराभूत केले तर टीम इंडिया सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ होईल. टीम इंडियाने मायदेशात झालेल्या मागील तिन्ही टी-२० मालिका सलग जिंकल्या आहेत. भारताने तिन्ही मालिकेत विरोधी संघांना क्लिन स्वीप दिला आहे.

    • भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-२० सामन्यात पराभूत केले तर टीम इंडिया सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ होईल. टीम इंडियाने मायदेशात झालेल्या मागील तिन्ही टी-२० मालिका सलग जिंकल्या आहेत. भारताने तिन्ही मालिकेत विरोधी संघांना क्लिन स्वीप दिला आहे.

आयपीएलचे (ipl2022) १५ वे सीझन संपले आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना सुरुवात होत आहे. यासाठीच दक्षिण आफ्रिकेचा (south africa) संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. दोन्ही संघांमधील मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना दिल्लीतील (delhi) अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दक्षिण आफ्रिकेचा संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचला आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा हे आधीपासूनच भारतात उपस्थित आहेत. तर या मालिकेसाठीचा उर्वरित संघ आज पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व टेंम्बा बवुमा (temba bavuma) करत आहे.

या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात ट्रिस्टियन स्टब्सचाही समावेश आहे. स्टब्स हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (mumbai indians) खेळला आहे. मात्र, स्टब्स आयपीएलमध्ये विशेष अशी कामगिरी करु शकला नाही. दोन सामन्यात त्याने अवघ्या दोन धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याची नजर भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करण्यावर असेल. तसेच, एनरिच नॉर्खियानेही आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत होता.

दरम्यान, टीम इंडियाही दक्षिण आफ्रिकेचा बदला घेण्याच्या तयारीत असेल. या वर्षी जानेवारीमध्ये केएल राहुलच्या (klrahul) नेतृत्वाखाली टीम इंडियाला (team india) दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता.

या सोबतच भारतीय संघाला एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे. टीम इंडियाने मागील १२ टी-२० सामने हे सलग जिंकले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-२० सामन्यात पराभूत केले तर टीम इंडिया सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ होईल. टीम इंडियाने मायदेशात झालेल्या मागील तिन्ही टी-२० मालिका सलग जिंकल्या आहेत. भारताने तिन्ही मालिकेत विरोधी संघांना क्लिन स्वीप दिला आहे.

पुढील बातम्या