मराठी बातम्या  /  क्रीडा  /  … तर देशासाठी खेळू शकलो नसतो, श्रीनिवासन यांच्यासमोर धोनीनं व्यक्त केल्या भावना

… तर देशासाठी खेळू शकलो नसतो, श्रीनिवासन यांच्यासमोर धोनीनं व्यक्त केल्या भावना

Jun 02, 2022, 02:55 PM IST

    • धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तर १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम ठोकला.
धोनी

धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तर १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम ठोकला.

    • धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तर १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम ठोकला.

टीम इंडियाचा (team india) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (ms dhoni) बुधवारी तामिळनाडूच्या (tamilnadu)  तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका स्थानिक क्रिकेट अकादमीला भेट दिली. यावेळी त्याने उपस्थितांसमोर क्रिकेटर भाष्य केले. यावेळी 'जर मी माझ्या शाळेसाठी किंवा जिल्ह्यसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर कदाचित मला देशासाठीही क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसती, असे धोनीने म्हटले आहे. तसेच, क्रिकेटपटूंना आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटला पाहिजे असेही धोनी म्हणाला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या कार्यक्रमात महेंद्रसिंह धोनीने मनमोकळे पणाने उपस्थिांशी संवाद साधला. धोनीने आपल्या भाषणात म्हटले की, “मी प्रथमच अशा उत्सवाचा भाग आहे, ज्यामध्ये आपण एखाद्या जिल्हास्तरावरील क्रिकेट संघटनेचे यश साजरे करत आहोत. मी आमच्या जिल्हा क्रिकेट संघटनेचेही (रांची) (ranchi) यावेळी आभार मानू इच्छितो. तसेच, प्रत्येक खेळाडूला आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना अभिमान वाटला पाहिजे. मलाही माझ्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटायचा. मी माझ्या जिल्ह्याकडून खेळलो, त्यामुळेच मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, असे धोनी म्हणाला.

तसेच, 'मी जर माझ्या जिल्ह्यासाठी किंवा शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर देशासाठी खेळू शकलो नसतो, असंही धोनी म्हणाला.

यासोबतच, धोनीने २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरुवल्लर जिल्हा क्रिकेट संघटनेचे कौतुकही केले. या जिल्ह्यातून अनेक क्रिकेटपटू उदयास आले आहेत, ज्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. या कार्याक्रमाला धोनीसोबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे देखिल उपस्थित होते.

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी-

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाही जिंकला होता, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले जाते. कारण धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले आहेत. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा होता. 

धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तर १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम ठोकला.

विभाग

पुढील बातम्या