मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WATCH : फक्त ‘या’ गोष्टीवर कंट्रोल कर, जगावर राज्य करशील... शमीचा उमरानला गुरूमंत्र

WATCH : फक्त ‘या’ गोष्टीवर कंट्रोल कर, जगावर राज्य करशील... शमीचा उमरानला गुरूमंत्र

Jan 22, 2023, 04:45 PM IST

    • Umran Malik takes Inteview Mohammed Shami : न्यूझीलंडविरुद्ध रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर मोहम्मद शमीने उमरान मलिकला खास सल्ला दिला आहे.
umran malik and shami interview

Umran Malik takes Inteview Mohammed Shami : न्यूझीलंडविरुद्ध रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर मोहम्मद शमीने उमरान मलिकला खास सल्ला दिला आहे.

    • Umran Malik takes Inteview Mohammed Shami : न्यूझीलंडविरुद्ध रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर मोहम्मद शमीने उमरान मलिकला खास सल्ला दिला आहे.

Mohammed Shami Advised Umran Malik : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. यासोबतच भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, यासाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या विजयानंतर उमरान मलिकने मोहम्मद शमीची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शमीने उमरानला एक खास सल्लाही दिला. या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.

या मुलाखतीची छोटीशी क्लिप बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वप्रथम उमरान मलिक म्हणतो की, माझा आवडता गोलंदाज मोहम्मद शमी माझ्यासोबत आहे. यानंतर उमरान मलिकने शमीला प्रश्न केला की, तू सामन्यात नेहमी आनंदी असतोस, कधीही दबावात नसतोस याचे रहस्य काय?

या प्रश्नाचे उत्तर देताना शमी म्हणाला की, “जेव्हा आपण देशासाठी खेळतो तेव्हा तुम्हाला दबाव घेण्याची गरज नसते. स्वतःवर, तुमच्या कौशल्यांवर विश्वास ठेवायला हवा. संकटात तुम्ही इकडे तिकडे भटकू शकता. पण जर तुम्ही प्रसन्न असाल तर तुमच्या कौशल्यात आणखी सुधारणा होते.

शमीने उमरानला दिला खास सल्ला

यानंतर शमीने उमरानला भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उमरानला एक सल्ला देताना शमीने सांगितले की, तुझा वेग खेळणे सोपे नाही. फक्त लाईन आणि लेन्थवर थोडेसे काम करणे आवश्यक आहे, जर आपण ते नियंत्रित करू शकलो तर आपण जगावर राज्य करू शकतो".

पुढील बातम्या