मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shami vs Akhtar: सीधी बात नो बकवास! शमीनं ५ शब्दात काढली शोएब अख्तरची विकेट

Shami vs Akhtar: सीधी बात नो बकवास! शमीनं ५ शब्दात काढली शोएब अख्तरची विकेट

Nov 13, 2022, 07:59 PM IST

    • Mohammad Shami tweet on Shoaib Akhtar karma: शमीच्या या ट्वीटला काही मिनिटांतच हजारो रिट्विट्स आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसेच शमीचे हे ट्वीट ट्रेंडिंगमध्ये आले आहे. वर्ल्डकप दरम्यान शोएब अख्तर सतत टीम इंडियावर टीका करत होता. तसेच, त्याने सेमीफायनलमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर आनंदही साजरा केला होता.
Mohammad Shami VS Shoaib Akhtar

Mohammad Shami tweet on Shoaib Akhtar karma: शमीच्या या ट्वीटला काही मिनिटांतच हजारो रिट्विट्स आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसेच शमीचे हे ट्वीट ट्रेंडिंगमध्ये आले आहे. वर्ल्डकप दरम्यान शोएब अख्तर सतत टीम इंडियावर टीका करत होता. तसेच, त्याने सेमीफायनलमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर आनंदही साजरा केला होता.

    • Mohammad Shami tweet on Shoaib Akhtar karma: शमीच्या या ट्वीटला काही मिनिटांतच हजारो रिट्विट्स आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसेच शमीचे हे ट्वीट ट्रेंडिंगमध्ये आले आहे. वर्ल्डकप दरम्यान शोएब अख्तर सतत टीम इंडियावर टीका करत होता. तसेच, त्याने सेमीफायनलमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर आनंदही साजरा केला होता.

Pakistan vs England T20 World Cup Final: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील दिली आहे. ही प्रतिक्रिया आता चांगल्याच चर्चेचा विषय ठरली आहे. शमीने प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला प्रत्युत्तर दिले आहे.

शमीच्या ट्वीटमध्ये काय आहे?

वास्तविक, सेमी फायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. त्यानंतर शोएबने एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी ट्विट केला होता. याला आता शमीने प्रत्युत्तर दिले आहे. शमीने शोएबच्या ट्वीटला रिप्लाय करताना लिहिले आहे की, ‘माफ कर भाऊ, पण ही कर्माची फळं आहेत’.

शमीच्या या ट्वीटला काही मिनिटांतच हजारो रिट्विट्स आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसेच शमीचे हे ट्वीट ट्रेंडिंगमध्ये आले आहे. वर्ल्ड कप दरम्यान शोएब अख्तर सतत टीम इंडियावर टीका करत होता. तसेच, त्याने सेमीफायनलमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर आनंदही साजरा केला होता.

T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये काय घडलं?

मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून केवळ बाबर आझम (३२) आणि शान मसूद (३८) हेच मोठी खेळी करू शकले, त्यांच्याशिवाय कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाही. दुसरीकडे, इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (नाबाद ५२) धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडने १९ षटकात विजयी लक्ष्य गाठले.

पुढील बातम्या