मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shahid Afridi : शाहीद आफ्रिदीनं तिरंग्यासोबत हे काय केलं? भारत-पाकिस्तानात व्हिडीओ तुफान व्हायरल

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदीनं तिरंग्यासोबत हे काय केलं? भारत-पाकिस्तानात व्हिडीओ तुफान व्हायरल

Mar 19, 2023, 08:13 PM IST

    • shahid afridi viral video with india flag LLC 2023: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सध्या कतारमध्ये आहे. तो तेथे लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका भारतीय चाहत्याला तिरंग्यावर ऑटोग्राफ देताना दिसत आह.
shahid afridi viral video with india flag

shahid afridi viral video with india flag LLC 2023: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सध्या कतारमध्ये आहे. तो तेथे लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका भारतीय चाहत्याला तिरंग्यावर ऑटोग्राफ देताना दिसत आह.

    • shahid afridi viral video with india flag LLC 2023: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सध्या कतारमध्ये आहे. तो तेथे लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका भारतीय चाहत्याला तिरंग्यावर ऑटोग्राफ देताना दिसत आह.

shahid afridi llc : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. काश्मीर असो किंवा भारतीय क्रिकेट, प्रत्येक मुद्द्यावर तो भारताविरुद्ध आगपाखड करत असतो. भारताविरोधात बोलून नेहमीच पाकिस्तानी मीडियात चर्चेत येणारा शाहिद आफ्रिदी आता भारताचा राष्ट्रध्वज हातात घेतल्याबद्दल कौतुकाचा विषय ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भारतीय क्रिकेट चाहता दिसत आहे. हा चाहता सुरक्षा रक्षक देखील आहे. तो शाहीद आफ्रिदीला ऑटोग्राफ मागताना दिसत आहे. यावर आफ्रिदीने लगेच तिरंगा हातात धरला आणि त्यावर सही करून तिरंगा फॅनला परत केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

यानंतर पाकिस्तानी चाहते शाहीद आफ्रिदीचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना एका पाकिस्तानी युजरने लिहिले की, “बडे दिलवाले शाहिद आफ्रिदी. एका भारतीय चाहत्याला तिरंग्यावर ऑटोग्राफ दिला”.

अशाच प्रतिक्रिया इतर अनेक चाहत्यांकडूनही आल्या आहेत.

खरं तर, शाहिद आफ्रिदी कतारमध्ये आयोजित लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. तो आशिया लायन्स संघाचा कर्णधार आहे. शोएब अख्तर, मिसबाह-उल-हक यांच्यासह अनेक बडे क्रिकेटपटू या संघात खेळत आहेत. त्यांचा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.

पुढील बातम्या