मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma : रोहित शर्मानं रचला इतिहास, गेल-डीव्हिलियर्सच्या या खास क्लबमध्ये समावेश, यादीत कोण-कोण पाहा?

Rohit Sharma : रोहित शर्मानं रचला इतिहास, गेल-डीव्हिलियर्सच्या या खास क्लबमध्ये समावेश, यादीत कोण-कोण पाहा?

Apr 23, 2023, 12:03 AM IST

    • rohit sharma 250 sixes in ipl : रोहित शर्माने आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण केले आहेत. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात २५० षटकार मारणारा फक्त तिसरा खेळाडू आहे. तर पहिला भारतीय खेळाडू आहे.
rohit sharma 250 sixes in ipl

rohit sharma 250 sixes in ipl : रोहित शर्माने आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण केले आहेत. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात २५० षटकार मारणारा फक्त तिसरा खेळाडू आहे. तर पहिला भारतीय खेळाडू आहे.

    • rohit sharma 250 sixes in ipl : रोहित शर्माने आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण केले आहेत. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात २५० षटकार मारणारा फक्त तिसरा खेळाडू आहे. तर पहिला भारतीय खेळाडू आहे.

mi vs pbks ipl 2023 : आयपीएल 2023 च्या ३१व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर २२ एप्रिल (शनिवार) रोजी झालेल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी २१५ धावांचे आव्हान होते, मात्र मुंबईचा संघ ६ बाद २०१ धावाच करू शकला.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ठरला, त्याने अखेरच्या षटकात घातक गोलंदाजी केली. मुंबईला अखेरच्या ६ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती, पण अर्शदीपने त्या करू दिल्या नाहीत. अर्शदीपने सामन्यात २९ धावात सर्वाधिक ४ बळी घेतले.

दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने भीम पराक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने या सामन्यात शानदार खेळी केली. रोहितने २७ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय रोहित शर्माने कॅमेरून ग्रीनसोबत चांगली भागीदारी केली.

सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा

वास्तविक, रोहित शर्माने अतिशय खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण केले आहेत. रोहित आयपीएलमध्ये २५० षटकार मारणारा फक्त तिसरा खेळाडू आहे. रोहित शर्मापूर्वी केवळ ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी असा पराक्रम केला आहे. ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये ३५७ षटकार आहेत. तर एबी डिव्हिलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २५१ षटकार ठोकले आहेत. याशिवाय महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, किरॉन पोलार्ड आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.

पुढील बातम्या