मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma & Virat Kohli: रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं! यापुढे निवड होणार नाही

Rohit Sharma & Virat Kohli: रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं! यापुढे निवड होणार नाही

Jan 09, 2023, 10:19 PM IST

    • Rohit Sharma & Virat Kohli t20 career end:  स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची यापुढे भारताच्या T20 मध्ये निवड होणार नाही. तसेच, नवीन निवड समिती आता कायमस्वरूपी टी-20 ची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवू इच्छित आहेत.
Rohit Sharma & Virat Kohli

Rohit Sharma & Virat Kohli t20 career end: स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची यापुढे भारताच्या T20 मध्ये निवड होणार नाही. तसेच, नवीन निवड समिती आता कायमस्वरूपी टी-20 ची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवू इच्छित आहेत.

    • Rohit Sharma & Virat Kohli t20 career end:  स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची यापुढे भारताच्या T20 मध्ये निवड होणार नाही. तसेच, नवीन निवड समिती आता कायमस्वरूपी टी-20 ची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवू इच्छित आहेत.

rohit sharma and virat kohli 20 career: टी-20 विश्वचषक २०२२ पासून भारतीय संघात अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. आता टीम इंडियाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचा भाग असणार नाहीत, असे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, रोहित आणि विराटची यापुढे टी-20 टीममध्ये निवड होणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भविष्यात टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची निवड होण्याची शक्यता आता नगण्य आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी एका चॅनलला ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीच्या सदस्यांना विराट आणि रोहित यांच्याशी त्यांच्या टी-२० मधील भविष्याबद्दल बोलायचे आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याकडे लक्ष वेधले होते, मात्र आता पहिल्यांदाच सूत्रांच्या हवाल्याने नवीन निवड समितीचा विचार समोर आला आहे. रोहित आणि विराट या दोघांनीही श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी निवडले नव्हते. परंतु आता बीसीसीआयला या दोघांपासून दूर जाऊन पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषक संघावर युवा खेळाडूंसह लक्ष केंद्रित करायचे आहे.

रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेनंतर समोर आली माहिती

दरम्यान, ही बातमी त्याच दिवशी आली आहे. ज्या दिवशी रोहितने आपण टी-20 क्रिकेट सोडलेले नाही, असे वक्तव्य केले होते. रोहितने आजच (९ जानेवारी) पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते. तर दुसरीकडे, विराट कोहलीनेही भविष्यातील टी-20 मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे.

तथापि, बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समिती आता कायमस्वरूपी टी-20 ची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवू इच्छित आहेत. मात्र, या संदर्भात, निवड समिती टेबलवर रोहित आणि कोहलीशी बोलल्यानंतरच हा निर्णय घेणार आहेत.

रोहित-विराटचे टी-20 करिअर

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १४८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १४० डावांमध्ये त्याने ३१.३२ च्या सरासरीने आणि १३९.२४च्या स्ट्राईक रेटने ३८५३ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ शतके आणि २९ अर्धशतके केली आहेत.

तर विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ११५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १०७ डावांमध्ये त्याने ५२.७३ च्या सरासरीने आणि १३७.९६च्या स्ट्राईक रेटने ४००८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ३७ अर्धशतके केली आहेत.

पुढील बातम्या