मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs AFG: सामन्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या चाहत्यांचा राडा; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

PAK vs AFG: सामन्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या चाहत्यांचा राडा; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Sep 08, 2022, 09:41 AM IST

    • PAK vs AFG: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. शोएब अख्तरने अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.
अफगाणिस्तानच्या चाहत्यांचा स्टेडियममध्ये राडा

PAK vs AFG: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. शोएब अख्तरने अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.

    • PAK vs AFG: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. शोएब अख्तरने अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.

PAK vs AFG: आशिया कप २०२२ मध्ये काल पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानच्या विजयामुळे भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. दरम्यान, या सामन्यावेळी स्टेडियममध्ये मोठा राडा झाला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यावेळी चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. यावेळी मैदानात खेळाडुंमध्ये तू-तू, मै-मै झाल्याचं दिसून आलं. पाकिस्तानी फलंदाजाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजाला बॅट दाखवत इशारा दिला. मैदानात यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर सामन्यावंतर स्टेडियममध्ये झालेल्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या नसीम शाहने २ षटकार खेचत विजय मिळवून दिला. हा सामना बघायला आलेल्या चाहत्यांनी या विजयानंतर स्टेडियममध्ये राडा घातला. खुर्च्या एकमेकांना फेकून मारल्या. तसंच एकमेकांची कॉलर पकडून मारहाणही केली गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत व्हावं लागल. विजयाचा घास हातातोंडाशी आला असताना तो हिरावून घेतल्याच्या भावनेतून अफगाणिस्तानचे चाहते नाराज झाले. यानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांना मारहाण केली. तसंच स्टेडियममध्येही राडा घालत तोडफोड केल्याचा आरोप आता होत आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. शोएब अख्तरने अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.

सुपर ४ मध्ये याआधी भारताचा सलग दोनवेळा पराभव झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तानला १ विकेटने पराभूत व्हावे लागले. पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर आता फायनलमध्ये धडक मारली आहे. दुसऱ्या बाजूला श्रीलंकेनेसुद्धा फायनल गाठलीय. आता रविवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपसाठी अंतिम सामना रंगणार आहे.

विभाग

पुढील बातम्या