मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs AFG T20: नसीम शाहच्या २ षटकारांनी पाकिस्तान फायनलमध्ये, अफगाणिस्तान-भारत आशिया चषकातून बाहेर

PAK vs AFG T20: नसीम शाहच्या २ षटकारांनी पाकिस्तान फायनलमध्ये, अफगाणिस्तान-भारत आशिया चषकातून बाहेर

Sep 07, 2022, 11:21 PM IST

    • Pakistan Vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4: पाकिस्तानने अफगाणिस्तानचा १ विकेटने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शेवटच्या षटकात नसीम शाहने सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला. फायनलमध्ये  पाकिस्तानचा सामना ११ सप्टेंबरला श्रीलंकेशी होणार आहे.
Pakistan Vs Afghanistan

Pakistan Vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4: पाकिस्तानने अफगाणिस्तानचा १ विकेटने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शेवटच्या षटकात नसीम शाहने सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला. फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना ११ सप्टेंबरला श्रीलंकेशी होणार आहे.

    • Pakistan Vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4: पाकिस्तानने अफगाणिस्तानचा १ विकेटने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शेवटच्या षटकात नसीम शाहने सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला. फायनलमध्ये  पाकिस्तानचा सामना ११ सप्टेंबरला श्रीलंकेशी होणार आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानचा १ विकेटने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शेवटच्या षटकात नसीम शाहने सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पाकिस्तानला विजयासाठी सहा चेंडूत ११ धावा करायच्या होत्या. फझल हक फारुकीच्या सुरुवातीच्या दोन चेंडूंवर २ षटकार ठोकून नसीमने सामना संपवला. त्याचवेळी अफगाणिस्तानसह भारत आशिया चषकातून बाहेर पडला आहे. फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना ११ सप्टेंबरला श्रीलंकेशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा करून सामना जिंकला. त्यांच्याकडून शादाब खानने ३६ , इफ्तिखार अहमदने ३० , मोहम्मद रिझवानने २० आणि आसिफ अलीने १६ धावा केल्या. नसीम शाह ४ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला.

तर अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकी आणि फरीद अहमद मलिकने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर राशिद खानने दोन सेट फलंदाज बाद करत पाकचे कंबरडे मोडले.

या सामन्यानंतर गुणतालिकेत श्रीलंका चार गुणांसह पहिल्या तर पाकिस्तान समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. त्याआधी शुक्रवारी सुपर-४ मध्येही हे दोघे आमने सामने येणार आहेत.

 अफगाणिस्तानचा डाव

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १२९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झाद्रानने ३५ तर हजरतुल्ला झाझाईने २१ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानचे इतर फलंदाज आज खास काही करु शकले नाहीत. आशिया चषक २०२२ मध्ये शानदार फॉर्मात असणारा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आजच्या सामन्यात मोठी खेळी करु शकला नाही. गुरबाज १७ धावा करुन बाद झाला. तर शेवटी राशिद खानने १५ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. अफगाणिस्तानची शारजाहमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

पुढील बातम्या