मराठी बातम्या  /  क्रीडा  /  NZ vs SL : फलंदाज रनआऊट असूनही पंच म्हणाले ‘नॉटआऊट’; कारण ऐकून प्रेक्षकांनी मारला डोक्यावर हात

NZ vs SL : फलंदाज रनआऊट असूनही पंच म्हणाले ‘नॉटआऊट’; कारण ऐकून प्रेक्षकांनी मारला डोक्यावर हात

Mar 28, 2023, 07:47 PM IST

  • NZ vs SL 1st ODI: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.

Chamika Karunaratne Run Out

NZ vs SL 1st ODI: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.

  • NZ vs SL 1st ODI: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.

Chamika Karunaratne Run Out: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी ऑकलँडच्या ईडन पार्क मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं एकतर्फी विजय मिळवत श्रीलंकेच्या संघाला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० नं पिछाडीवर ढकललं. दरम्यान, या सामन्यातील रनआऊट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची फलंदाजी सुरू असताना चमिका करुणारत्ने रनआऊट असूनही अंपायरने नॉटआऊट घोषित केले. यामागचे कारण ऐकल्यानंतर खेळाडूंसह मैदानातील प्रेक्षकांनीही डोक्यावर हात मारला. चमिका करुणारत्ने नॉटआऊट देण्यामागे काय कारण होते? हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

श्रीलंकेच्या डावातील १८व्या षटकात न्यूझीलंडचा गोलंदाज ब्लेयर टिकनर गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर चमिका करूणारत्नेने मिड ऑनच्या दिशेने फटका मारून दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, खेळाडूने चपळाईने चेंडू नॉन स्ट्राइकर एंडच्या दिशेने फेकला. त्यावेळी क्रिज सोडून पुढे गेलेल्या चमिका करूणारत्नेने उडी मारून आपला विकेट्स वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत टिकनरने बेल्स उडवल्या. टीव्ही स्क्रीनवर रनआऊट तपासले असता चमिका रनआऊट असल्याचे स्पष्ट दिसले. मात्र, त्यानंतरही अंपायरने त्याला नॉटआऊट घोषित केले. हे पाहून स्वत: चमिका देखील आश्चर्यचकीत झाला.

महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी टिकनरने बेल्स उडवली, तेव्हा लाईट न जळल्याने चमिकाला नॉटआऊट ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सामनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या बेल्स या चार्जेबल असतात. परंतु, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात त्या डिस्चार्ज झाल्या. यामुळे चमिकाला जीवनदान मिळाले, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

न्यूझीलंडचा संघ:

चाड बोवेस, विल यंग, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, विकेटकिपर), रचिन रवींद्र, हेन्री शिपले, इश सोढी, मॅट हेन्री, ब्लेअर टिकनर, मार्क चॅपमन, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, बेन लिस्टर.

श्रीलंकेचा संघ:

पाथुम निसांका, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, चारिथ असालंका, दासुन शानाका(क), चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, धनंजया डी सिल्वा, सॅमरामोदंका, सॅमरामोदंका. सहान अरचिगे, दुनिथ वेललागे

विभाग

पुढील बातम्या