मराठी बातम्या  /  क्रीडा  /  French Open 2023 : जोकोविचनं फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत नदालला मागे टाकलं

French Open 2023 : जोकोविचनं फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत नदालला मागे टाकलं

Jun 11, 2023, 10:33 PM IST

    • Novak Djokovic, French Open 2023 : फ्रेंच ओपन 2023 च्या अंतिम सामन्यात सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने दणदणीत विजय मिळवला. त्याने कॅस्पर रुडचा ७-६, ६-३, ७-५ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह जोकोविचने इतिहास रचला असून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रमही केला आहे.
novak djokovic won french open 2023

Novak Djokovic, French Open 2023 : फ्रेंच ओपन 2023 च्या अंतिम सामन्यात सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने दणदणीत विजय मिळवला. त्याने कॅस्पर रुडचा ७-६, ६-३, ७-५ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह जोकोविचने इतिहास रचला असून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रमही केला आहे.

    • Novak Djokovic, French Open 2023 : फ्रेंच ओपन 2023 च्या अंतिम सामन्यात सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने दणदणीत विजय मिळवला. त्याने कॅस्पर रुडचा ७-६, ६-३, ७-५ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह जोकोविचने इतिहास रचला असून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रमही केला आहे.

novak djokovic won french open 2023 : सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन 2023 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. रविवारी (११ जून) झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ७-६, ६-३, ७-५ असा पराभव केला. यासह जोकोविचने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचची कोणत्याही ग्रँडस्लॅममधील ही ३४वी फायनल होती, तर रुडच्या कारकिर्दीतील ही तिसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. रुडला अद्याप एकही ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकता आलेले नाही.

जोकोविचने नदालला मागे टाकले

हे विजेतेपद पटकावण्याबरोबरच जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला मागे टाकले आहे. जोकोविचने आतापर्यंत सर्वाधिक २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तर नदालच्या नावावर २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आहे, ज्याने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे खेळाडू

नोव्हाक जोकोविच: २३

राफेल नदाल: २२

रॉजर फेडरर: २०

जोकोविचने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले

ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनमध्ये जोकोविचचे वर्चस्व आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर त्याने ७ विम्बल्डन विजेतेपद पटकावले. फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन स्पर्धेत तो प्रत्येकी ३-३ चॅम्पियन राहिला आहे.

जोकोविचची ग्रँडस्लॅम विजेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन: १०

फ्रेंच ओपन: ३

विम्बल्डन: ७

यूएस ओपन: ३

पुढील बातम्या