मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra : नीरज चोप्रा किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार? डायमंड लीग कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या

Neeraj Chopra : नीरज चोप्रा किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार? डायमंड लीग कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या

May 05, 2023, 09:39 AM IST

    • neeraj chopra schedule diamond league 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज (५ मे) दोहा डायमंड लीगमध्ये आपले आव्हान सादर करणार आहे. नीरजचे लक्ष्य ९० मीटरचे अंतर पार करण्याचे आहे. सीझनच्या पहिल्या स्पर्धेत तो अशी कामगिरी करतो का याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल.
neeraj chopra schedule diamond league 2023

neeraj chopra schedule diamond league 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज (५ मे) दोहा डायमंड लीगमध्ये आपले आव्हान सादर करणार आहे. नीरजचे लक्ष्य ९० मीटरचे अंतर पार करण्याचे आहे. सीझनच्या पहिल्या स्पर्धेत तो अशी कामगिरी करतो का याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल.

    • neeraj chopra schedule diamond league 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज (५ मे) दोहा डायमंड लीगमध्ये आपले आव्हान सादर करणार आहे. नीरजचे लक्ष्य ९० मीटरचे अंतर पार करण्याचे आहे. सीझनच्या पहिल्या स्पर्धेत तो अशी कामगिरी करतो का याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल.

neeraj chopra schedule diamond league 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवणार आहे. नीरज चोप्रा शुक्रवारी (५ मे) दोहा डायमंड लीगमध्ये आपले आव्हान सादर (Neeraj Chopra Wanda Diamond League Live Streaming) करणार आहे. डायमंड लीग मालिकेचा पहिला टप्पा आज कतारची राजधानी दोहा येथे होत आहे. यात दमदार कामगिरी करून नीरज चोप्रा या मोसमाची शानदार सुरुवात करू इच्छितो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये होणाऱ्या इव्हेंटध्ये नीरज चोप्राला विश्वविजेता अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा), टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता जेकब वडलेज (चेक प्रजासत्ताक) या खेळाडूंचे आव्हान असेल. अशा स्थितीत गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरजसाठी ही स्पर्धा सोपी जाणार नाही.

नीरज चोप्रा किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये?

दोहा डायमंड लीग 2023 भारतात स्पोर्ट्स18 1 आणि स्पोर्ट्स 18 1 एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल. यासोबतच या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि त्याच्या वेबसाइटवरही उपलब्ध असेल. नीरज चोप्राचा इव्हेंट भारतीय वेळेनुसार ५ मे (शुक्रवार) रोजी रात्री १०.१४ वाजता सुरू होईल.

नीरजची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर आहे. हा राष्ट्रीय विक्रमही आहे. त्याने २०१८ दोहा डायमंड लीगमध्ये चौथे स्थान पटकावले होते. त्याने त्यावर्षी ८७.४३m भाला फेकला होता. तर फिटनेसमुळे नसल्यामुळे नीरजला गेल्या वर्षी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेता आला नव्हता.

एल्डहोज पॉलवरही भारतीयांच्या नजरा

२०२२ कॉमनवेल्थ गेम्स ट्रिपल जंप चॅम्पियन एल्डहोज पॉल देखील दोहा डायमंड लीगमध्ये आपले आव्हान सादर करेल. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन पेड्रो पिचार्डो, क्युबाचा डायमंड लीग विजेता अँडी डायझ हर्नांडेझ आणि दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता (२०१२ आणि २०१६ ) आणि पाच वेळा विश्वविजेता अमेरिकेचा ख्रिश्चन टेलर या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

विभाग

पुढील बातम्या