मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Moeen Ali : कसोटीसाठी स्टोक्सनं पुन्हा मेसेज केला तर काय करशील? मोईन अलीनं सरळ सांगितलं

Moeen Ali : कसोटीसाठी स्टोक्सनं पुन्हा मेसेज केला तर काय करशील? मोईन अलीनं सरळ सांगितलं

Aug 01, 2023, 09:54 AM IST

    • Moeen Ali retirement : मोईन अलीने २०२१ मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु अ‍ॅशेस २०२३ सुरू होण्याआधी त्याला कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्ती मागे घेण्यासाठी एक मेसेज केला होता. मोईनने आपल्या कर्णधाराची मेसेजवरील विनंती मान्य करून ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला.
Moeen Ali retirement

Moeen Ali retirement : मोईन अलीने २०२१ मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु अ‍ॅशेस २०२३ सुरू होण्याआधी त्याला कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्ती मागे घेण्यासाठी एक मेसेज केला होता. मोईनने आपल्या कर्णधाराची मेसेजवरील विनंती मान्य करून ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला.

    • Moeen Ali retirement : मोईन अलीने २०२१ मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु अ‍ॅशेस २०२३ सुरू होण्याआधी त्याला कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्ती मागे घेण्यासाठी एक मेसेज केला होता. मोईनने आपल्या कर्णधाराची मेसेजवरील विनंती मान्य करून ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला.

Moeen Ali Retires Again From Test Cricket : अ‍ॅशेस 2023 मध्ये इंग्लंडने शेवटची कसोटी ४९ धावांनी जिंकली. ऑस्ट्रेलियन संघाने या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने जिंकले होते, तर इंग्लंड संघाने तिसरी आणि पाचवी कसोटी जिंकली. ओव्हलवर झालेल्या शेवटच्या कसोटीनंतर इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. यामध्ये वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि फिरकी अष्टपैलू मोईन अलीच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे मोईन अलीने केवळ या मालिकेसाठी टेस्ट निवृत्ती मागे घेतली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

स्टोक्सच्या मेसेजनंतर निवृत्ती मागे घेतली

मोईन अलीने २०२१ मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु अ‍ॅशेस २०२३ सुरू होण्याआधी त्याला कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्ती मागे घेण्यासाठी एक मेसेज केला होता. मोईनने आपल्या कर्णधाराची मेसेजवरील विनंती मान्य करून ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला. पण आता अ‍ॅशेस 2023 नंतर पुन्हा तो कसोटीतून निवृत्त झाला आहे.

ओव्हल कसोटी सामना संपल्यानंतर मोईन अलीने कसोटी निवृत्तीबाबत सांगितले की, हे आश्चर्यकारक आहे. परत कसोटी खेळल्यानंतर बरे वाटले. जेव्हा मला स्टोक्सचा मेसेज आला तेव्हा मला त्या वेळी आश्चर्य वाटले कारण जॅक लीच जखमी झाल्याचे मला माहीत नव्हते. मला माहित होते की हे मानसिकदृष्ट्या सोपे होणार नाही, परंतु त्याहूनही अधिक ते माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या कठीण होते. ही एक उत्तम मालिका होती, जी मी कधीही विसरणार नाही.

आता जर स्टोक्सचा मेसेज आला तर डिलीट करेन

मोईन अलीने पुढे म्हटले की, “मी याआधीही नंबर-3 क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी पुरेसे चांगले होते. माझे काम पूर्ण झाले आहे, आता जर स्टोक्सने मला पुन्हा परत येण्याचा मॅसेज केला तर मी तो डिलीट करेन. माझा वेळ खूप छान होता, पण मला माहित आहे की माझ्यासाठी एवढेच आहे”.

 

पुढील बातम्या