मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2024 बद्दल मोठी बातमी! दुसऱ्या देशात होणार स्पर्धा, जाणून घ्या कारण

IPL 2024 बद्दल मोठी बातमी! दुसऱ्या देशात होणार स्पर्धा, जाणून घ्या कारण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 30, 2023 03:07 PM IST

IPL 2024 and Lok Sabha Elections : आयपीएल 2024 च्या हंगामाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या पुढील म्हणजेच 2024 हंगामाची तयारी करत आहे. तसेच पुढील आयपीएल परदेशात होण्याची शक्यता आहे.

IPL 2024
IPL 2024 (Chennai Super Kings Twitter)

IPL 2024 and Lok Sabha Elections : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) पुढील हंगामाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलचा पुढचा हंगाम म्हणजेच आयपीएल २०२४ लवकरात लवकर आयोजित करण्याची तयारी करत आहे. तसेच पुढील आयपीएल परदेशात होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याचे प्रमुख कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका हे आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल २०२४ साठी एक विंडो शोधून स्पर्धा लवकर होऊ शकते. आम्हाला माहीत आहे की निवडणुका होणार आहेत आणि या सर्व गोष्टी आमच्या योजनेत समाविष्ट आहेत.

गरज भासल्यास पुढील वर्षी मार्चच्या सुरुवातीला आयपीएल होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तसेच, मे महिन्याच्या मध्यात त्याची सांगता होऊ शकते. तथापि, सध्या आमचे संपूर्ण लक्ष या वर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 वर आहे. आयपीएलला अजून बराच वेळ शिल्लक आहे. गोष्टी कशा पुढे जातात ते पाहूया.

आयपीएल परदेशात खेळवले जाऊ शकते

आयपीएल दुसऱ्या देशात आयोजित करण्याबाबत बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, 'याआधीही आम्ही निवडणुका आणि स्पर्धा दोन्ही चांगल्या प्रकारे सांभाळल्या आहेत. गरज भासल्यास आयपीएल 2024 परदेशातही करता येईल. ही स्पर्धा केवळ भारतातच आयोजित करणे हे आमचे पहिले प्राधान्य असले तरी सद्यस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. अजून बराच वेळ आहे, त्यामुळे आताच त्याबद्दल बोलू नये'.

लोकसभा निवडणुकीमुळे दोनदा IPL परदेशात झाले

लोकसभा निवडणुकीमुळे आतापर्यंत दोन वेळा IPL भारताबाहेर खेळण्यात आले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल काही भागांत पार पडली. त्यावेळी अर्धी स्पर्धा भारतात, तर उर्वरित सामने यूएईमध्ये झाले.

WhatsApp channel