मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KKR vs PBKS Head To Head: कोलकाता- पंजाब यांच्यात आज 'करो या मरो'चा सामना, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

KKR vs PBKS Head To Head: कोलकाता- पंजाब यांच्यात आज 'करो या मरो'चा सामना, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

May 08, 2023, 10:15 AM IST

  • Kolkata Knight Riders vs Punjab Kings Head To Head Record: आयपीएल २०२३ च्या ५३व्या सामन्यात कोलकाता आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

KKR vs PBKS

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Head To Head Record: आयपीएल २०२३ च्या ५३व्या सामन्यात कोलकाता आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

  • Kolkata Knight Riders vs Punjab Kings Head To Head Record: आयपीएल २०२३ च्या ५३व्या सामन्यात कोलकाता आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

IPL 2023: आयपीएल २०२३च्या ५३व्या सामन्यात कोलकाताचा संघ पंजाब किंग्जशी भिडणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. कोलकाताच्या संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला. तर, पंजाबच्या संघाला त्यांच्या मागच्या सामन्यात मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशात कोलकाताचा संघ विजय घौडदौड सुरु ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर, पंजाबचा संघाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि पंजाबचा संघ ३१ सामन्यात एकमेकांशी भिडला. यापैकी ३१ सामन्यात कोलकाताच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, २० सामने पंजाबने जिंकले आहेत. ही आकडेवारी पाहता कोलकाताच्या संघाचे पारडे जड दिसत आहे. यातच आजचा सामना केकेआरच्या होम ग्राऊंडवर खेळला जाणार आहे, ज्याचा फायदा कोलकाताच्या संघाला मिळू शकतो.

कोलकाता नाइट रायडर्स:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरायण, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, एन जगदीसन, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंह, टिम साउथी, डेव्हिड विसे, उमेश यादव, आर्या देसाई.

पंजाब किंग्स:

प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सिकंदर रझा, अथर्व तायडे, मोहित राठी, शिवम सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत सिंह भाटिया, भानुका राजपक्षे, बलतेज सिंग, विद्वत कवेरप्पा, गुरनूर ब्रार.

विभाग

पुढील बातम्या