मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah IPL : मुंबईला भासतेय बुमराहची उणीव?, रोहित शर्माने दुसरा ऑप्शन सांगितला

Jasprit Bumrah IPL : मुंबईला भासतेय बुमराहची उणीव?, रोहित शर्माने दुसरा ऑप्शन सांगितला

Apr 04, 2023, 03:34 PM IST

    • Rohit Sharma On Jasprit Bumrah : बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चरच्या हाती देण्यात आली. परंतु पहिल्या पराभवानंतर रोहित शर्माच्या चिंता वाढल्या आहे.
Rohit Sharma On Jasprit Bumrah (PTI)

Rohit Sharma On Jasprit Bumrah : बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चरच्या हाती देण्यात आली. परंतु पहिल्या पराभवानंतर रोहित शर्माच्या चिंता वाढल्या आहे.

    • Rohit Sharma On Jasprit Bumrah : बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चरच्या हाती देण्यात आली. परंतु पहिल्या पराभवानंतर रोहित शर्माच्या चिंता वाढल्या आहे.

Jasprit Bumrah IPL 2023 Replacement : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही मुंबई इंडियन्सचा पहिल्याच सामन्यात धक्कादायक पराभव झाला आहे. आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीनं मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. जोफ्रा आर्चरसह इतर सर्व गोलंदाजांना बंगळूरुच्या फलंदाजांनी धुतलं. परंतु आता पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर मुंबईला जसप्रीत बुमराहची उणीव भासत असल्याचं मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मान्य केलं आहे. परंतु दुखापतग्रस्त असल्यानं बुमराह आयपीएलच्या या हंगामात खेळू शकणार नाहीये. त्यामुळं आता रोहितने बुमराहची उणीव भरून काढण्यासाठी एक खास प्लॅन आखला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही अजून ३० ते ४० धावा अधिक केल्या असत्या तर आम्ही निश्चित जिंकलो असतो. आम्हाला मागील सहा ते आठ महिन्यांपासून जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत खेळावं लागत आहे. बुमराह सामन्यात नसणं ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु तो नसताना त्याची जबाबदारी इतर गोलंदाजांना घ्यावी लागणार आहे. त्याच गोष्टीवर अवलंबून न राहता आम्हाला आणखी चांगली कामगिरी करावी लागणार असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं आहे.

दुखापत होणं हे कोणत्याही खेळाडूच्या नियंत्रणात नसतं. त्यामुळं अशा गोष्टींमध्ये आपण जास्त काही करू शकत नाही. त्यामुळं आता जोफ्रा आर्चरसह इतर प्रतिभावंत गोलंदाजांना समर्थन द्यायला हवं. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आम्ही चूका केल्या त्यामुळं निकाल वेगळा लागला. आता त्यातून पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचं रोहित म्हणाला. आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवणार असल्याचा विश्वासही रोहितने व्यक्त केला आहे.

पुढील बातम्या