मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: उमरान मलिकची तुफानी गोलंदाजी, पुजाराचा सौराष्ट्र संघ ९८ धावांवर गारद

Umran Malik: उमरान मलिकची तुफानी गोलंदाजी, पुजाराचा सौराष्ट्र संघ ९८ धावांवर गारद

Oct 01, 2022, 01:27 PM IST

    • Irani Cup 2022 Umran Malik: इराणी चषक 2022 मध्ये सौराष्ट्रचा संघ पहिल्या डावात ९८ धावांत सर्वबाद झाला आहे. यादरम्यान उमरान मलिकने धारदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले.
Umran Malik

Irani Cup 2022 Umran Malik: इराणी चषक 2022 मध्ये सौराष्ट्रचा संघ पहिल्या डावात ९८ धावांत सर्वबाद झाला आहे. यादरम्यान उमरान मलिकने धारदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले.

    • Irani Cup 2022 Umran Malik: इराणी चषक 2022 मध्ये सौराष्ट्रचा संघ पहिल्या डावात ९८ धावांत सर्वबाद झाला आहे. यादरम्यान उमरान मलिकने धारदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले.

इराणी चषक २०२२ मध्ये सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यात सामना खेळला जात आहे. यामध्ये शेष भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान सौराष्ट्रचा संघ पहिल्या डावात अवघ्या ९८ धावांवर ऑलआऊ झाला. संघाकडून धर्मेंद्र जडेजाने सर्वाधिक २८ धावा केल्या. तर मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांनी शेष भारतासाठी धोकादायक गोलंदाजी केली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

उमरानने अवघ्या ५ षटकांत ३ गडी बाद केले

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रचा संघ ९८ धावांत सर्वबाद झाला. यादरम्यान उमरानने शेष भारतासाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने ५.५ षटकात २५ धावा देत ३ बळी घेतले. कुलदीप सेनने ७ षटकात ४१ धावा देत ३ बळी घेतले. मुकेश कुमारने १० षटकात २३ धावा देत ४ बळी घेतले.

चेतेश्वर पुजारा एक धाव काढून बाद

सौराष्ट्रकडून धर्मेंद्र जडेजाने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार मारले. तर चेतेश्वर पुजारा एक धाव काढून बाद झाला. कर्णधार जयदेव उनाडकटने १३ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या मदतीने १२ धावा केल्या. दरम्यान शेष भारताचे कर्णधारपद हनुमा विहारीकडे आहे.

दोन्ही संघ

शेष भारत- हनुमा विहारी (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, यश धुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल, केएस भरत, उपेंद्र यादव, जयंत यादव, सौरभ कुमार, आर साई किशोर, मुकेश कुमार, उमरान मलिक, कुलदीप सेन, उम्रान मलिक आणि अर्जन नागवासवाला.

सौराष्ट्र- जयदेव उनाडकट (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शेल्डन जॅक्सन, अर्पित वसावडा, चिराग जानी, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, प्रेराक मंकड, चेतन साकारिया, स्नेल पटेल, विश्वराजसिंह जडेजा, कुशांग पटेल, हार्विक किरण, पराक्रम देसाई.

पुढील बातम्या