मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashes 2023 : कॅप्टन्सीमध्ये बेन स्टोक्स धोनीच्या पुढे, माहीचा हा मोठा विक्रम मोडला

Ashes 2023 : कॅप्टन्सीमध्ये बेन स्टोक्स धोनीच्या पुढे, माहीचा हा मोठा विक्रम मोडला

Jul 10, 2023, 01:00 PM IST

    • eng vs aus 3rd test Ashes 2023 : मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे गरजेचे होते.
bes stokes and ms dhoni test

eng vs aus 3rd test Ashes 2023 : मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे गरजेचे होते.

    • eng vs aus 3rd test Ashes 2023 : मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे गरजेचे होते.

अॅशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव केला. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी २५१ धावांचे लक्ष्य होते. बेन स्टोक्सच्या संघाने ५० षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात २५४ धावा करत सामना जिंकला. हॅरी ब्रूक इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ९३ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार मारले. याशिवाय ख्रिस वोक्सने ४७ चेंडूत नाबाद ३२ धावांचे योगदान दिले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे गरजेचे होते. इंग्लंडने हा सामना जिंकून ५ कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेत पुनरागमन केले आहे. मालिका आता २-१ अशा स्थितीत पोहोचली आहे.

धावांचा पाठलाग करताना सर्वात यशस्वी कर्णधार

दरम्यान, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्ससाठीही हा विजय खूप महत्त्वाचा होता. या विजयासह बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. बेन स्टोक्स हा आता सर्वाधिक वेळा २५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या संघाचा कर्णधार ठरला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने असा पराक्रम ५ वेळा केला आहे. स्टोक्सच्या आधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २५० धावांच्या लक्ष्याचा चार वेळा यशस्वी पाठलाग केला आहे.

२५० धावांचे टार्गेट गाठणारे कर्णधार

बेन स्टोक्स (५)

एमएस धोनी (४)

ब्रायन लारा आणि रिकी पाँटिंग (३)

तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांचा समावेश आहे. दोन्ही माजी कर्णधारांच्या नेतृत्वाखाली संघाने २५० प्लस धावसंख्येचा तीनदा यशस्वी पाठलाग केला आहे. त्याच वेळी, या हेडिंग्लेच्या मैदानावर २५० प्लस धावांचे लक्ष्य सर्वाधिक ६ वेळा चेस गेले केले आहे. यात पहिला क्रमांक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचा आहे. तेथे असा पराक्रम ७ वेळा झाला आहे.

पुढील बातम्या