
पॉप आयकॉन ब्रिटनी स्पीयर्स सध्या चर्चेत आहे. अलीकडेच ब्रिटनी स्पियर्सने स्वत:वर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली आहे. ब्रिटनी स्पीयर्सने दावा केला आहे की, एनबीए स्टार व्हिक्टर वेम्बन्यामाच्या (Victor Wembanyama) बॉडी गार्ड्सपैकी एकाने तिला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारली.
आता पॉप आयकॉन ब्रिटनी स्पीयर्सने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आता याप्रकरणी आपली माफी मागण्यात यावी, असेही तिने म्हटले आहे. तथापि, एनबीए स्टार व्हिक्टर वेम्बन्यामा याबाबत म्हणला की, ब्रिटनीने आपल्याला मागून पकडण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटनीने तिच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने सांगितले की, ती लॉस एंजेलिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये होती, जिथे तिने एनबीए स्टार व्हिक्टर वेम्बन्यामाला पाहिले आणि त्याला भेटायला गेली. तिने पुढे लिहिले की तिने व्हिक्टरला त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्याच्या खांद्यावर थाप दिली. पण त्याने (व्हिक्टर) कुठेतरी असे म्हटले आहे, की मी त्याला मागून पकडले, परंतु असे झाले नाही, मी फक्त त्याच्या खांद्यावर थोपटले.
पण यानंतर त्याच्या सुरक्षा रक्षकाने तिच्या नकळत सर्वांसमोर तिला थप्पड मारली आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. ब्रिटनीने पुढे लिहिले की, मला बॉडी गार्ड्सच्या गराड्यात राहण्याचाआणि चाहत्यांमध्ये वावरण्याचाअनुभव माहित आहे, परंतु मी कधीही लोकांशी गैरवर्तन किंवा हिंसा केली नाही. लोकांनी त्यांच्या पदाचा आणि यशाचा गर्व बाळगू नये".
याच मुद्द्यावर एनबीए स्टार व्हिक्टर वेम्बन्यामाने सांगितले की, त्याला मागून थाप मारली नाही, तर पकडले होते. अशा परिस्थितीत सिक्युरिटीने तिला लगेच मागे ढकलले. तसेच, ती ब्रिटनी स्पीयर्स आहे, हे आपल्या लक्षातदेखील आले नाही. हॉटेलमध्ये काही तासांनंतर ही बाब समजली. व्हिक्टर वेम्बन्यामा हा फ्रान्सचा प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आहे.
संबंधित बातम्या
