मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG vs MI Head To Head : मुंबईनं लखनौविरुद्ध आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही, हे आकडे पाहा, डोकं चक्रावून जाईल

LSG vs MI Head To Head : मुंबईनं लखनौविरुद्ध आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही, हे आकडे पाहा, डोकं चक्रावून जाईल

May 24, 2023, 03:01 PM IST

    • IPL 2023 मधील प्लेऑफचा दुसरा सामना म्हणजेच एलिमिनेटर सामना २४ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (mi) यांच्यात खेळवला जाईल.
mi vs lsg

IPL 2023 मधील प्लेऑफचा दुसरा सामना म्हणजेच एलिमिनेटर सामना २४ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (mi) यांच्यात खेळवला जाईल.

    • IPL 2023 मधील प्लेऑफचा दुसरा सामना म्हणजेच एलिमिनेटर सामना २४ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (mi) यांच्यात खेळवला जाईल.

mi vs lsgIPL 2023 Eliminator : IPL 2023 चा एलिमिनेटर सामना २४ मे रोजी चेन्नईतील एम चिदंबरम येथे लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांनी आपला शेवटचा लीग सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. अशा स्थितीत लखनौ आणि मुंबई यांच्यात हाय व्होल्टेज थरार पाहायला मिळू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

दोन्ही संघांमध्ये एकाहून एक मॅच विनर्स आहेत, जे कधीही एकहाती सामना फिरवून शकतात. पण लखनौ आणि मुंबई यांच्यात कोणता संघ वरचढ आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३ सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये लखनौने मुंबई इंडियन्सवर वर्चस्व गाजवले आहे. LSG ने तीनही सामन्यांत मुंबईचा पराभव केला आहे.

तसेच, या मोसमात या दोन संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यात लखनौने मुंबईचा अवघ्या ५ धावांनी पराभव केला होता. या आकडेवारीनुसार लखनऊचा एमआयवर वरचष्मा आहे. पण मुंबई इंडियन्स ही आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे आणि प्लेऑफमध्ये ते आणखी धोकादायक बनतात. अशा परिस्थितीत एमआय लखनौला धूळ चारू शकते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.

एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लखनौ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

पुढील बातम्या