मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Indian Football : एशियन गेम्समध्ये खेळायचं आहे, आमची मदत करा, टीम इंडियाच्या कोचचं पंतप्रधान मोदींना पत्र

Indian Football : एशियन गेम्समध्ये खेळायचं आहे, आमची मदत करा, टीम इंडियाच्या कोचचं पंतप्रधान मोदींना पत्र

Jul 17, 2023, 07:05 PM IST

    • indian football team asian games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाच्या सहभागावर ग्रहण लागले आहे. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) क्रमवारीत भारत अव्वल ८ संघांच्या बाहेर आहे. आता फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
Indian Football

indian football team asian games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाच्या सहभागावर ग्रहण लागले आहे. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) क्रमवारीत भारत अव्वल ८ संघांच्या बाहेर आहे. आता फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

    • indian football team asian games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाच्या सहभागावर ग्रहण लागले आहे. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) क्रमवारीत भारत अव्वल ८ संघांच्या बाहेर आहे. आता फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

indian football coach igor stimac : एशियन गेम्स 2023 ही स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहे. या स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाच्या सहभागाला ग्रहण लागले आहे. आशियाई स्तरावरील टॉप-८ संघांमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा समावेश नाही, त्यामुळे भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्रीडा मंत्रालयानेही सांगितले की, सांघिक स्पर्धांसाठी फक्त त्याच खेळांचा विचार केला जाईल, ज्यांनी गेल्या एका वर्षात आशिया खंडात भाग घेणाऱ्या संघांमध्ये टॉप-८ क्रमांक मिळवला आहे.

एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन (AFC) देशांच्या क्रमवारीत भारत सध्या १८व्या स्थानावर आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यानही भारताने आपला फुटबॉल संघ पाठवला नव्हता. आता भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

इगोर स्टिमॅकने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. यात ते म्हणाले की, 'या संघाला स्पर्धेत खेळण्याची नितांत गरज आहे आणि संघ त्यास पूर्ण पात्र आहे. उद्धृत केलेली कारणे अयोग्य आहेत आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक या नात्याने ही बाब आपल्या आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. जेणेकरुन तुम्ही हस्तक्षेप करून आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व करण्यास मदत करू शकाल".

स्टिमॅक यांनी पुढे लिहिले की, 'आपलेच स्वतःचे मंत्रालय रँकिंगच्या बाबतीत सहभाग नाकारत आहे. तर वस्तुस्थिती अशी आहे की आमचा फुटबॉल संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी असलेल्या इतर काही क्रीडा संघांपेक्षा चांगल्या क्रमवारीत आहे. इतिहास आणि आकडे देखील याची साक्ष देतात.

'भारताने २०१७ मध्ये अंडर-17 फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले आणि पुढच्या पिढीतील महान खेळाडूंना तयार करण्यासाठी खूप गुंतवणूक केली. फिफा विश्वचषक खेळण्याच्या भारताच्या स्वप्नाला तुम्ही नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि मला खात्री आहे की तुमचा पाठिंबा असाच राहील, मग तो दिवस दूर नाही जेव्हा आम्ही जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सहभागी होऊ.

"एक राष्ट्रीय संघ म्हणून, आम्ही गेल्या ४ वर्षात खूप कठोर परिश्रम केले आहेत आणि काही उत्कृष्ट परिणाम साध्य केले आहेत जे हे सिद्ध करतात की आम्हाला सर्व भागधारकांचा पाठिंबा असल्यास आम्ही बरेच काही साध्य करू शकतो,"

 

पुढील बातम्या