मराठी बातम्या  /  क्रीडा  /  World Athletics Championship 2023: नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

World Athletics Championship 2023: नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

Aug 28, 2023, 03:23 AM IST

  • World Athletics Championship 2023 - जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे.

Neeraj Chopra poses after winning the gold medal in the Men's javelin throw final during the World Athletics Championships in Budapest, (Hungary) (AP)

World Athletics Championship 2023 - जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे.

  • World Athletics Championship 2023 - जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे.

हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने ८८.१७ मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली. २०२० साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला. यापूर्वी नीरज चोप्राने World Athletics Championship स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताला आतापर्यंत केवळ दोन वेळा पदके जिंकता आलेली आहेत. २००३ साली अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर गेल्यावर्षी भालाफेकपटू नीरज चोप्राने यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

दुसऱ्याच प्रयत्नात नीरजने सुवर्णपदकावर कोरले नाव

स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेला २५ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राकडून पदकाची आशा निर्माण झाली होती. स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिला थ्रो फाउल ठरल्यानंतर नीरजने दुसरा प्रयत्न केला. यावेळी तो ८६.३२ मीटर, ८४.६४ मीटर, ८७.७३ मीटर आणि ८३.९८ मीटर अंतरावर भाला फेकण्यात यशस्वी ठरला. तर पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम याने ८७.८२ मीटर भालाफेक करून या स्पर्धेत रजत पदक पटकावले. ८६.६७ मीटर भालाफेक करून चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेकपटू याकूब वालेश याने कांस्यपदक पटकावले.

अभिनव बिंद्रानंतर नीरज चोप्रा ठरला पहिला खेळाडु

टोकियो येथे २०२१ साली पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले होते. यूजिन येथे २०२२ साली झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर नीरजने आज सुवर्णपदक जिंकलं. यापूर्वी भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने भारतासाठी अशीच सुवर्ण कामगिरी केली होती. बिंद्राने वयाच्या २३ व्या वर्षी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी बिंद्रा याने ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते. अशाप्रकारे एकाच वेळी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा भारतातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

पुढील बातम्या