मराठी बातम्या  /  क्रीडा  /  World Athletics Championship : नीरज चोप्रा आज 'गोल्ड'साठी उतरणार, रिलेचीही फायनल, सामने कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

World Athletics Championship : नीरज चोप्रा आज 'गोल्ड'साठी उतरणार, रिलेचीही फायनल, सामने कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

Aug 27, 2023, 01:13 PM IST

    • World Athletics Championship 2023 : पण यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात.
World Athletics Championship

World Athletics Championship 2023 : पण यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात.

    • World Athletics Championship 2023 : पण यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात.

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे पदकांचे खाते अद्याप उघडलेले नाही. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताला आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकता आली आहेत. २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या वर्षी यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पण यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात.

भारताला ५ पदके जिंकण्याची संधी

आज (२७ ऑगस्ट) बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी भारताला ५ पदके जिंकण्याची संधी आहे. यामध्ये सर्वात मोठी आशा गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज भालाफेकच्या अंतिम फेरीत गोल्ड मेडलसाठी खेळणार आहे. नीरज व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय भालाफेकपटू डीपी मनू आणि किशोर जेनादेखील भालाफेकच्या अंतिम फेरीत आहेत.

4x400 मीटर रिलेचा अंतिम सामना

भालाफेक व्यतिरिक्त ट्रॅक इव्हेंटमध्येही भारताची नजर दोन पदकांवर आहे. भारताच्या 4x400 मीटर पुरुष रिले संघाने शनिवारी अंतिम फेरीत धडक मारली. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांच्या चौकडीने यूएसएनंतर दुसरे स्थान पटकावले.

यासोबतच भारताचे आव्हान ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत असणार आहे. पारुल चौधरीने येथे अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील ट्रॅक इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पारुल ही दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे.

हे सर्व सामने कधी होतील?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११:४५ वाजता सुरू होईल. पारुल चौधरीचा स्टीपलचेस अंतिम सामना २८ ऑगस्ट रोजी रात्री १२:३५ वाजता सुरू होईल, तर पुरुषांच्या रिलेचा अंतिम सामना १:०७वाजता सुरू होईल.

लाइव्ह इव्हेंट कुठे बघायचा?

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या नवव्या दिवशीचे सर्व इव्हेंट्स स्पोर्ट्स 18 वर लाईव्ह दाखवले जातील. त्याच वेळी, लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी तुम्ही Jio Cinema अ‍ॅपवर जाऊ शकता.

पुढील बातम्या