मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA 2nd ODI Weather Report: दुसऱ्या वनडेतही पाऊस ठरणार व्हिलन? पाहा ‘असं’ असेल रांचीतलं हवामान

IND vs SA 2nd ODI Weather Report: दुसऱ्या वनडेतही पाऊस ठरणार व्हिलन? पाहा ‘असं’ असेल रांचीतलं हवामान

Oct 09, 2022, 10:52 AM IST

    • India Vs South Africa 2nd ODI pitch & Weather Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.
India Vs South Africa 2nd ODI

India Vs South Africa 2nd ODI pitch & Weather Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.

    • India Vs South Africa 2nd ODI pitch & Weather Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत आज रविवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

पीच रिपोर्ट-

रांचीमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल असेल. त्याचवेळी दव या सामन्यात मोठी भूमिका बजावणार आहे. अशा परिस्थितीत या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे हा योग्य निर्णय असेल. त्याच वेळी, या मैदानावर २८० ते ३२० पर्यंतचे टार्गेट सहज चेस होऊ शकते.

हवामान

रांचीमधील दुसऱ्या वनडेदरम्यान पाऊस दोन्ही संघांसाठी पाऊस अडचणीचा ठरू शकतो. रविवारी रांचीमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, मात्र, संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. Weather.com नुसार, रविवारी रांचीमध्ये पावसाची २५ टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामना प्रभावित होऊ शकतो. रांचीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल. या दरम्यान दुपारपर्यंत येथे ७५ टक्के आर्द्रता राहील. त्याच वेळी, येथे तापमान ३० अंशांच्या आसपास राहू शकते.

दोन्ही संभाव्य प्लेईंग ११

भारत -

शिखर धवन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर/रवी बिश्नोई, आवेश खान, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण अफ्रीका -

टेम्बा बवुमा (कप्तान), क्विंटन डी कॉक, जानेमन मलान, एडेन मार्करम, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, वायने पार्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगीडी, तबरेज़ शम्सी.

पुढील बातम्या