मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs PAK: १९वं षटक, हारिस रौफ आणि विराटचे २ षटकार, किंग कोहलीला आठवली मेलबर्नची 'ती' संध्याकाळ

IND vs PAK: १९वं षटक, हारिस रौफ आणि विराटचे २ षटकार, किंग कोहलीला आठवली मेलबर्नची 'ती' संध्याकाळ

Nov 26, 2022, 02:48 PM IST

    • Virat Kohli Remembers India-Pakistan Match After A Month: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना झाला होता. आता एक महिन्यानंतर विराट कोहलीला हा सामना आठवला आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता.
Virat Kohli

Virat Kohli Remembers India-Pakistan Match After A Month: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना झाला होता. आता एक महिन्यानंतर विराट कोहलीला हा सामना आठवला आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता.

    • Virat Kohli Remembers India-Pakistan Match After A Month: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना झाला होता. आता एक महिन्यानंतर विराट कोहलीला हा सामना आठवला आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता.

T20 विश्वचषक संपून १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. २२ ऑक्टोबरला सुरू झालेला टी-20 विश्वचषक १३ नोव्हेंबरला संपला. फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला. मात्र, सुपर-१२ मध्ये टीम इंडियाची कामगिरी दमदार होती. भारताने पाचपैकी चार सामने जिंकले होते आणि सर्वाधिक ८ गुणांसह उपांत्य फेरीत मजल मारली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताने सुपर-१२ फेरीत पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. त्याचवेळी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली. हा सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता आणि आता एका महिन्यानंतर विराट कोहलीला हा सामना आठवला आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला होता.

या सामन्याबाबत विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर आहे लिहिले की, “२३ ऑक्टोबर २०२२ हा दिवस माझ्या हृदयात नेहमीच खास असेल. क्रिकेटच्या खेळात इतकी ऊर्जा यापूर्वी कधीच जाणवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती ती”.

कोहलीने मेलबर्नमध्ये जवळपास १ लाख प्रेक्षकांसमोर ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली होती. टीम इंडियाला विजयी करूनच तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या खास खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. तसेच ICC चा प्लेअर ऑफ द मंथ देखील ठरला.

असा होता भारत-पाकिस्तान सामना

त्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताने २० षटकांत ८ बाद १५९ धावा केल्या. इफ्तिखार अहमदने ३४ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याचवेळी शान मसूदने ४२ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. तर भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताचे सुरुवातीचे फलंदाज फ्लॉप ठरले. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने ११३ धावांची भागीदारी केली. हार्दिक ४० धावा करून बाद झाला. तर कोहली शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने १९व्या षटकातील ५व्या चेंडूवर हरिस रौफला अप्रतिम षटकार ठोकला. तो शॉट ऑफ द टूर्नामेंट ठरला. शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. त्या कोहली-अश्विनने पूर्ण केल्या. कोहलीने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले.

पुढील बातम्या