मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टीम इंडियाला भेटायला गेला कॅप्टन कुल धोनी, ड्रेसिंग रूममध्ये उसळली गर्दी! BCCI ने शेअर केला VIDEO

टीम इंडियाला भेटायला गेला कॅप्टन कुल धोनी, ड्रेसिंग रूममध्ये उसळली गर्दी! BCCI ने शेअर केला VIDEO

Jan 26, 2023, 07:28 PM IST

  • MS Dhoni meets Indian cricket team : भारत व न्यूझीलंड संघादरम्यान सुरू होणाऱ्या टी २० मालिकेपूर्वी संघाला भेटण्यासाठी महेंद्रसिंह धोनी गेला होता. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

टीम इंडियाला भेटायला गेला कॅप्टन कुल धोनी

MS Dhoni meets Indian cricket team : भारत व न्यूझीलंड संघादरम्यान सुरू होणाऱ्या टी २० मालिकेपूर्वी संघाला भेटण्यासाठी महेंद्रसिंह धोनी गेला होता. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

  • MS Dhoni meets Indian cricket team : भारत व न्यूझीलंड संघादरम्यान सुरू होणाऱ्या टी २० मालिकेपूर्वी संघाला भेटण्यासाठी महेंद्रसिंह धोनी गेला होता. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारताने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा धुव्वा उडवला असून आता भारतीय संघ किवींविरुद्ध तीन सामन्यांची T20I मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना रांचीमध्ये शुक्रवारी होणार आहे. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना मोठे सरप्राईज मिळाले. भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंह धोनी स्वतः स्टेडियमवर पोहोचला, आणि ड्रेसिंग रुममध्ये त्याने खेळाडू आणि संघातील इतर सदस्यांची भेट घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे,ज्यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू त्यांच्या दिग्गज खेळाडूला चाहत्याप्रमाणे भेटताना दिसत आहेत. हार्दिक पांड्या आणि ईशान किशन हे देखील धोनीसोबत बोलताना दिसत आहेत. तर चहल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलसारखे खेळाडू माहीकडे टक लावून पाहत होते.

 

व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने लिहिले की, "पाहा रांचीमध्ये प्रशिक्षणादरम्यान आम्हाला कोण भेटायला आले – द ग्रेट एमएस धोनी!

पुढील बातम्या