मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Aus Semifinal : जिंकलेला सामना भारतानं गमावला, नॉक आऊट सामन्यात टीम इंडिया पुन्हा ढेर

Ind vs Aus Semifinal : जिंकलेला सामना भारतानं गमावला, नॉक आऊट सामन्यात टीम इंडिया पुन्हा ढेर

Feb 23, 2023, 10:02 PM IST

    • IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights : महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा या स्पर्धे्च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights

IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights : महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा या स्पर्धे्च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

    • IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights : महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा या स्पर्धे्च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

IND W vs AUS W T20 WC Semi-Final Highlights : भारतीय महिला क्रिकेट संघाचे T20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ धावांनी पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून १७२ धावा केल्या. भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय राहिला. टीम इंडियाने मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचे सोपे झेल सोडले. त्याचा परिणाम असा झाला की मुनी आणि लॅनिंगने मोठी खेळी खेळली. मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. याशिवाय लॅनिंगने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावांची खेळी खेळली.

हरमनप्रीत विचित्र पद्धतीने धावबाद

प्रत्युत्तरात भारतीय संघाला २० षटकांत ८ गडी बाद १६७ धावाच करता आल्या. एका टप्प्यावर भारताने १४ षटकांत ४ गडी गमावून १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला ३६ चेंडूत केवळ ४९ धावांची गरज होती. कर्णधार हरमनप्रीत कौर ३० चेंडूत ४३ आणि ऋचा घोषने १४ धावांवर खेळत होत्या. यानंतर पुढील षटकात हरमनप्रीतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच षटकात ती विचित्र पद्धतीने धावबाद झाली. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेताना ती बॅट क्रीजमध्ये ठेवताना मध्येच अडकली. हरमनप्रीतने एकाकी झुंज देताना ३४ चेंडूत ५२ धावा केल्या.

हरमनप्रीत बाद होताच पुढच्याच षटकात खराब शॉट खेळून रिचाही बाद झाली. १९व्या षटकात स्नेह राणा बाद झाल्याने भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. त्यावेळी दीप्ती शर्मा आणि राधा यादव क्रीजवर होते. मात्र, टीम इंडियाला केवळ १० धावा करता आल्या आणि ५ धावांनी सामना गमवावा लागला. हरमनप्रीतशिवाय जेमिमाने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया या स्टार्स अपयशी ठरल्या.

ऍशले गार्डनरने दोन बळी घेतले. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

पुढील बातम्या