मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO : सकरीन नहीं भाई, स्क्रीन होता है...', शोएब अख्तरने लाइव्ह शोमध्ये उडवली अकमलची खिल्ली, पाहा

VIDEO : सकरीन नहीं भाई, स्क्रीन होता है...', शोएब अख्तरने लाइव्ह शोमध्ये उडवली अकमलची खिल्ली, पाहा

Feb 23, 2023, 08:35 PM IST

    • Shoaib Akhtar On Kamran Akmal : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाईव्ह शोदरम्यान (shoaib akhtar mocked kamran akmal on live tv) कामरान अकमलच्या इंग्रजीची खिल्ली उडवली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Shoaib Akhtar On Kamran Akmal

Shoaib Akhtar On Kamran Akmal : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाईव्ह शोदरम्यान (shoaib akhtar mocked kamran akmal on live tv) कामरान अकमलच्या इंग्रजीची खिल्ली उडवली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    • Shoaib Akhtar On Kamran Akmal : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाईव्ह शोदरम्यान (shoaib akhtar mocked kamran akmal on live tv) कामरान अकमलच्या इंग्रजीची खिल्ली उडवली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

shoaib akhtar mocked kamran akmal on live tv : पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इंग्लिश हे सातत्याने चेष्टेचा विषय ठरला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमशिवाय संघातील अनेक खेळाडू खराब इंग्रजीमुळे अनेकदा ट्रोल झाले आहेत. या यादीत कामरान अकमल आणि उमर अकमल या खेळाडूंचाही समावेश होते. त्याचवेळी सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाईव्ह शोदरम्यान कामरान अकमलची खिल्ली उडवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर लाइव्ह शोदरम्यान कामरान अकमलला सांगत आहे की, 'सकरीन' नहीं होता है भाई... स्क्रीन होता है.

'सकरीन नहीं होता है भाई... स्क्रीन होता है'

वास्तविक, कामरान अकमल स्क्रीनऐवजी (Screen) सकरीन बोलताना दिसत आहे. यानंतर शोएब अख्तरने लाईव्ह शोमध्ये कामरान अकमलला करेक्ट केले. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्स कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

'बाबर आझम हा ब्रँड होऊ शकत नाही कारण...'

विशेष म्हणजे, शोएब अख्तरने यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या इंग्रजीचीही खिल्ली उडवली होती. बाबर आझम हा पाकिस्तानचा सर्वात मोठा ब्रँड असायला हवा होता, पण कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजीमुळे तो मोठा ब्रँड होऊ शकत नाही, असं शोएब अख्तर म्हणाला होता. तसेच, विराट कोहली हा एक मोठा ब्रँड आहे, कारण त्याचे संभाषण कौशल्य आणि इंग्रजी चांगले आहे, असेही तो म्हणाला होता. रावळपिंडी एक्सप्रेसने म्हटले की, क्रिकेट खेळणे आणि मीडिया हाताळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाबर आझमने यावर काम करावे.

 

पुढील बातम्या