मराठी बातम्या  /  क्रीडा  /  'मी मरण पत्कारले असते, पण मैदान सोडले नसते' विश्वचषकातील पराभव शोएब अख्तरच्या जिव्हारी

'मी मरण पत्कारले असते, पण मैदान सोडले नसते' विश्वचषकातील पराभव शोएब अख्तरच्या जिव्हारी

Feb 21, 2023, 08:36 PM IST

  • Shoaib Akhtar: टी-२० विश्वचषकातील पराभवावरून शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीवर जोरदार टीका केली आहे.

Shoaib Akhtar, Shaheen Afridi

Shoaib Akhtar: टी-२० विश्वचषकातील पराभवावरून शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीवर जोरदार टीका केली आहे.

  • Shoaib Akhtar: टी-२० विश्वचषकातील पराभवावरून शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीवर जोरदार टीका केली आहे.

Shoaib Akhtar Criticized Shaheen Afridi: ऑस्ट्रेलियात गेल्या पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात खराब सुरुवात होऊनही पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. परंतु, फायनल सामन्यात पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडकडून पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकातील पराभव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जिव्हारी लागलाय. त्याने पाकिस्तानच्या पराभवाला शाहीन आफ्रिदीला जबाबदार धरले आहे. दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदीला मैदान सोडावे लागले होते. त्याच्याऐवजी मी असतो तर मरण पत्कारले असते, पण मैदान सोडले नसते, अशा शब्दात शोएब अख्तरने शाहीन आफ्रीदीवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२२ मधील फायनल सामना रंगला होता. या सामन्यात शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. या सामन्यात शाहीन आफ्रीदीला फक्त २.१ षटक टाकता आले. यावरून शोएब अख्तरने शाहीन आफ्रीदीवर टीका केली आहे. "विश्वचषकाच्या फायनल सामन्यात जर मी शाहीन आफ्रीदीच्या जागी असतो तर, कधीच मैदान सोडले नसते. गुडघा नंतरही बरा झाला असता. पण ही संधी पुन्हा मिळाली नसती. मी त्यावेळी इंजेक्शन घेतले असते, दुखण्याचे औषध घेतले असते. पण माझा स्पेल पूर्ण केला असता. मी खाली पडलो असतो, पुन्हा उठलो असतो, पुन्हा खाली पडलो असतो, पण नक्कीच गोलंदाजी केली असते. मी मरण पत्कारले असते, पण मैदानात सोडले नसते, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

शाहीन आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत एकूण २५ कसोटी, ३२ एकदिवसीय आणि ४७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत आतापर्यंत ९९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे ६२ आणि ५८ विकेट्सची नोंद आहे.

विभाग

पुढील बातम्या