मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shane warne death : शेन वॉर्नचा मृत्यू कोविड लसीमुळं?; डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

Shane warne death : शेन वॉर्नचा मृत्यू कोविड लसीमुळं?; डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

Jun 22, 2023, 02:30 PM IST

  • Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Shane Warne

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

  • Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Shane Warne : फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याच्या अकाली मृत्यूबाबत एका वर्षानंतर डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोविड १९ ची लस असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

वर्षभरापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शेन वॉर्नचा मृत्यूृ झाला होता. थायलंडला सुट्टीसाठी गेला असताना ही दुर्दैवी बातमी आली होती. मृत्युसमयी त्याचं वय ५२ होतं. त्यामुळं त्याच्या निधनाचा क्रीडा जगताला व त्याच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला होता.

शेन वॉर्ननं कोविडच्या लसीचे दोन डोस घेतले होते. त्यानं जी लस घेतली होती, त्यामुळं हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात, असं आता सांगितलं जात आहे.

शेन वॉर्ननं कोणती लस घेतली होती?

निधनाच्या ९ महिने आधी शेन वॉर्ननं mRNA या कोविड प्रतिबंधक लसीचा डोस घेतला होता. या लसीमुळं हृदयाशी संबंधित आजार वाढतात. ही लसच वॉर्नच्या मृत्यूचं कारण ठरली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियन मेडिकल प्रोफेशनल्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ख्रिस नील आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा यांनी शेन वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास केला. त्यांच्या मते ज्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा सौम्य त्रास आहे. अशा व्यक्तीनं कोविड mRNA लसीचा डोस घेतल्यास त्याचा हृदयाचा त्रास वाढू शकतो.

'शेन वॉर्न हा स्वच्छंदी स्वभावाचा होता. त्याची मौजमस्तीचं जीवन जगत होता. त्याचं वजनही जास्त होतं आणि तो धूम्रपानही करायचा. आरोग्याची फारशी फिकीर तो करायचा नाही. हे खरं असलं तरी वयाच्या ५२ व्या वर्षी एका स्पोर्ट्समनला हृदयविकाराचा झटका ही काही सामान्य बाब नाही, असं मल्होत्रा म्हणाले.

शेन वॉर्नच्या रक्तवाहिन्यांमध्ये किचिंत फुगवटा असावा आणि लसीचे डोस घेतल्यानंतर त्यात वेगानं वाढ झाली असावी. माझ्या अनेक रुग्णांच्या बाबतीत व खुद्द माझ्या वडिलांच्या बाबतीतही मला तसा अनुभव आला आहे. फायझर mRNA लसीचे दोन डोस घेतल्यानंतर माझ्या वडिलांचा हृदयविकार झपाट्यानं बळावला व नंतर त्यांचा मृत्यूही झाला, असं डॉक्टर मल्होत्रा यांनी सांगितलं. mRNA या लसीचा वापर ताबडतोब थांबवण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

विभाग

पुढील बातम्या