मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India Vs Wales Hockey: भारतानं उडवला वेल्सचा धुव्वा, पण क्वार्टर फायनलसाठी न्यूझीलंडला हरवावं लागणार

India Vs Wales Hockey: भारतानं उडवला वेल्सचा धुव्वा, पण क्वार्टर फायनलसाठी न्यूझीलंडला हरवावं लागणार

Jan 19, 2023, 09:15 PM IST

    • India Vs Wales Hockey Hockey World Cup Match 2023 : हॉकी विश्वचषकात टीम इंडियाने गुरुवारी (१९ जानेवारी) वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळला. भारताने पूल डी मध्ये वेल्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला आता क्रॉस ओव्हरचा सामना खेळणार आहे. 
India Vs Wales Hockey Hockey World Cup

India Vs Wales Hockey Hockey World Cup Match 2023 : हॉकी विश्वचषकात टीम इंडियाने गुरुवारी (१९ जानेवारी) वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळला. भारताने पूल डी मध्ये वेल्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला आता क्रॉस ओव्हरचा सामना खेळणार आहे.

    • India Vs Wales Hockey Hockey World Cup Match 2023 : हॉकी विश्वचषकात टीम इंडियाने गुरुवारी (१९ जानेवारी) वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळला. भारताने पूल डी मध्ये वेल्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला आता क्रॉस ओव्हरचा सामना खेळणार आहे. 

India Vs Wales Hockey Hockey World Cup Match 2023 : हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने शेवटच्या साखळी सामन्यात वेल्सचा ४-२ असा पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडिया ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे अव्वल क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या बरोबरीने ७ गुण आहेत, पण टीम इंडिया गोल फरकाने मागे आहे. भारतापेक्षा इंग्लंडने या स्पर्धेत जास्त गोल केले आहेत. टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

त्यामुळे आता क्वार्टर फायनल गाठण्यासाठी भारताला क्रॉसओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. हा सामना २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता होईल.

भारतीय संघासाठी सामन्यातील पहिला गोल समशेर सिंगने २१व्या मिनिटाला केला. त्याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. समशेरनंतर आकाशदीपने सलग २ गोल केले. आकाशदीपने दोन्ही मैदानी गोल केले. त्याने ३२व्या आणि ४५व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. या विश्वचषकातील त्याचा पहिला गोल ठरला. आकाशदीपला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

ग्रुपमधील अव्वल संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये जाणार

जगातील अव्वल १६ संघांमध्ये ही स्पर्धा सुरु आहे. या १६ संघांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना क्रॉसओव्हर फेरी खेळावी लागेल. क्रॉसओव्हर सामन्यातील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करतील. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि शेवटी २ संघ अंतिम फेरीत खेळतील आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन्ही संघ कांस्यपदकासाठी सामना खेळतील.

 

पुढील बातम्या