मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याची चर्चा, माजी क्रिकेटपटूंची 'या' नावाला पसंती?

रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याची चर्चा, माजी क्रिकेटपटूंची 'या' नावाला पसंती?

Nov 15, 2022, 12:21 PM IST

  • Hardik Pandya: वर्ल्ड कपच्या तयारीसाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि त्याची तयारी दोन वर्षे आधीपासून सुरू करायची असते असं म्हणत माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाने टी२० संघाचा कर्णधार बदलायला हवा असं म्हटलं आहे.

रोहितला कर्णधार पदावरून हटवण्याची चर्चा, माजी क्रिकेटपटूंची कुणाला पसंती? (ANI)

Hardik Pandya: वर्ल्ड कपच्या तयारीसाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि त्याची तयारी दोन वर्षे आधीपासून सुरू करायची असते असं म्हणत माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाने टी२० संघाचा कर्णधार बदलायला हवा असं म्हटलं आहे.

  • Hardik Pandya: वर्ल्ड कपच्या तयारीसाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि त्याची तयारी दोन वर्षे आधीपासून सुरू करायची असते असं म्हणत माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाने टी२० संघाचा कर्णधार बदलायला हवा असं म्हटलं आहे.

Hardik Pandya: टी २० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवड समितीचे माजी अध्य़क्ष के श्रीकांत यांनी म्हटलं की, २०२४ मध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपआधी अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला टी२०चा कर्णधार करायला हवा. भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून संघाच्या बांधणीची प्रक्रिया सुरू करायला हवी.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

के श्रीकांत यांनी म्हटलं की, मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर हार्दिक पांड्याला २०२४ च्या वर्ल्ड कपसाठी कर्णधार करायला हवं असं म्हटलं असतं. मी थेट हा निर्णय घेतला असता. तसंच संघाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया आजपासूनच सुरू करायला हवी. हे काम न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून सुरू व्हायला हवे.

तुम्ही आजपासूनच सुरुवात केली पाहिजे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि त्याची तयारी दोन वर्षे आधीपासून सुरू करायची असते. यासाठी तुम्हाला जे काही करायचं असतं मग त्यात कोणताही प्रयोग असेल किंवा इतर काही, ते एक वर्षाच्या आतच. त्यानंतर पुन्हा २०२३ पर्यंत एक संघ तयार करा आणि हाच संघ वर्ल्ड कपमध्ये खेळेल हे निश्चित करा असंही के श्रीकांत म्हणाले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी२० सामन्यांची मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माला या मालिकेत विश्रांती देण्यात आली असून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. के श्रीकांत म्हणाले की, वर्ल्ड कपआधी वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू शोधायला पाहिजेत. १९८३चा वर्ल्ड कप, २०११ चा वर्ल्ड कप आणि २००७ चा टी २० वर्ल्ड कप पाहा. आपण यात विजय मिळवला कारण आपल्याकडे वेगवान गोलंदाज, अष्टपैलू होते. तसंच काही खेळाडू हे फलंदाजीसह गोलंदाजीही करू शकत होते.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, भारतीय संघाने फक्त एका कर्णधारावर अवलंबून राहू नये. संघातील अनेक खेळाडूंना नेतृत्व करण्यासाठी तयार केलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की कर्णधार बदलला म्हणजे निकाल बदलतो. पण असे तुम्ही निकाल बदलू शकत नाही. हार्दिक पांड्याबाबत आपल्याला हे समजून घ्यायला हवं की तो वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे. तसंच त्याच्या तंदुरुस्तीचाही मुद्दा आहे. ऐन वर्ल्ड कपवेळी जर कर्णधारच दुखापतीने बाहेर पडला तर तुमच्याकडे त्याला पर्याय असायला हवा अन्यथा अडचण होऊ शकते.

पुढील बातम्या