मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammad Amir: 'वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याची आमची लायकीच नव्हती, कसे पोहोचलो जगाला माहीत आहे'

Mohammad Amir: 'वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याची आमची लायकीच नव्हती, कसे पोहोचलो जगाला माहीत आहे'

Nov 15, 2022, 11:52 AM IST

  • Mohammad Amir: टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर यानं सडकून टीका केली आहे.

Pakistan Cricket Team

Mohammad Amir: टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर यानं सडकून टीका केली आहे.

  • Mohammad Amir: टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर यानं सडकून टीका केली आहे.

T20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धा संपली असली तरी विजय-पराभवाचं कवित्व अद्याप सुरूच आहे. अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघावर त्यांच्याच देशातील माजी क्रिकेटपटूंनी टीकेचा मारा सुरू केला आहे. ‘वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याची पाकिस्तानी संघाची लायकीच नव्हती, आम्ही कसे पोहोचलो हे सगळ्या जगाला माहीत आहे,’ अशी बोचरी टीका पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर यानं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सिडनीमधील काही सामन्यांव्यतिरिक्त पाकिस्तानचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नव्हते. मेलबर्नमधील गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर त्याच्या संघाचे फलंदाज धडपडताना दिसत होते. त्यामुळं शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान २० षटकांत केवळ १३७ धावा करू शकला, याचं आम्हाला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, असंही मोहम्मद अमीर म्हणाला.

'खरंतर आम्ही फायनलमध्ये खेळलो हीच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही फायनलमध्ये खेळण्याच्या लायकीचे नव्हतो. आम्ही फायनलमध्ये कसे पोहोचलो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. अल्लाहच्या मेहेरबानीनं आम्ही तिथं पोहोचलो. आमच्या फलंदाजांची कामगिरी पाहिली तर याची प्रचिती कुणालाही येईल, अशी पुस्तीही त्यानं जोडली.

‘मेलबर्नची खेळपट्टी पहिल्या सामन्यात होती, तशीच असेल तर पाकिस्तानी संघाला मोठा संघर्ष करावा लागेल हे मी आधीच सांगितलं होतं आणि झालंही तसंच. आमची सुरुवात चांगली झाली नाही, त्याचा फटका आम्हाला बसला,’ असं तो म्हणाला. लेगस्पिनर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळ करण्याच्या मोहम्मद हरीसच्या रणनीतीवरही अमीरनं टीका केली.

पुढील बातम्या