मराठी बातम्या  /  क्रीडा  /  अर्जेंटिनाच्या खेळाडुकडून एम्बापेची टिंगल; फ्रान्सच्या क्रिडामंत्र्याने हासडली शिवी…

अर्जेंटिनाच्या खेळाडुकडून एम्बापेची टिंगल; फ्रान्सच्या क्रिडामंत्र्याने हासडली शिवी…

Dec 23, 2022, 09:23 PM IST

    • अर्जेंटिनाचा गोली मार्टिनेझच्या कृत्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटले होते. एम्बापेवर त्याने केलेली टिंगल फ्रान्सच्या लाखो फुटबॉलप्रेमींना अजिबात आवडले नव्हते.
French Sports Minister Amelie Oudea-Castera accused Argentine players of being vulgar for mocking Kylian Mbappe

अर्जेंटिनाचा गोली मार्टिनेझच्या कृत्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटले होते. एम्बापेवर त्याने केलेली टिंगल फ्रान्सच्या लाखो फुटबॉलप्रेमींना अजिबात आवडले नव्हते.

    • अर्जेंटिनाचा गोली मार्टिनेझच्या कृत्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटले होते. एम्बापेवर त्याने केलेली टिंगल फ्रान्सच्या लाखो फुटबॉलप्रेमींना अजिबात आवडले नव्हते.

कतार मध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक पटकावल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडुंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रान्सच्या संघाने प्रत्येकी तीन-तीन गोल केले होते. अखेरीस पेनल्टी शुटआउटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेंटिना संघाने फ्रान्सला ४-२ ने पराभूत करून फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात फ्रान्सचा खेळाडु एम्बापेने एकट्याने अर्जेंटिनाविरुद्ध तीन गोल ठोकले होते. तब्बल ३६ वर्षानंतर अर्जेंटिना संघ फुटबॉल विश्वचषक जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचे लाखो फुटबॉल प्रेमी लाडक्या संघाच्या स्वागतासाठी राजधानी ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकासह देशात दाखल होताच खुल्या बसमधून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी अर्जेंटिना संघाचा गोलकिपर मार्टिनेझ बसच्या टपावर बसलेला दिसत होता. यावेळी मार्टिनेझने हातात एक छोटी, लहान मुलांच्या खेळातली बाहुली पकडली होती. त्या बाहुलीला फ्रान्स संघाचा स्टार फुटबॉलर एम्बापेचा चेहरा लावण्यात आला होता. मार्टिनेझच्या या कृत्याचे सोशल मीडियावरही पडसाद उमटले होते. फ्रान्सच्या लाखो फुटबॉलप्रेमींना मार्टिनेझचे हे कृत्य अजिबात आवडले नव्हते.

फ्रान्सच्या क्रिडामंत्री एमेली ऑडी कॅस्टोरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मार्टिनेझचे हे कृत्य एखाद्या ‘गावंढळा’सारखे होतं, असं म्हटलं आहे. ‘मला ते वर्तन तिरस्करणीय वाटलं. ते अयोग्यच नव्हतं तर असभ्य वर्तन होतं. प्रसंगानुरुप तर नव्हतंच’ अशी प्रतिक्रिया क्रिडामंत्री एमेली ऑडी कॅस्टोरा यांनी एका फ्रेंच रेडिओला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

'अंतिम सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाच्या ड्रेसिंग रुममध्ये एक वाक्य उच्चारलं गेलं… एक मिनिट शांतता…. एम्बापेसाठी… हा मार्टिनेझ स्वतःला वेगळं समजत नाही. उलट त्याचं वर्तन दयनीय असं होतं', असं क्रिडामंत्री एमेली ऑडी कॅस्टोरा यांनी सांगितलं. फ्रान्स फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष नोएल ग्रीट यांनी अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनला एक पत्र लिहून अर्जेंटिनाच्या विजय मिरवणुकीत अशाप्रकारे विचित्र प्रकारचा अतिरेक झाला असल्याची तक्रार केली असल्याची माहिती एमेली ऑडी कॅस्टोरा यांनी दिली.

पेनल्टी शुटआउट चुकवलेल्या खेळाडुंवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याची तक्रार

दरम्यान, अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शुटआउट हुकलेल्या किग्स्ले कोमन, ऑरलिन चोमेनी आणि कोलो मुएनी या खेळाडुंबाबत काही फ्रेंच फुटबॉल चाहत्यांनी वर्षद्वेषी टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. कोलो मुएनी याने अतिरिक्त वेळेत मिळालेली संधी वाया घालवली होती. याप्रकरणी फ्रेंच फुटबॉल फेडरेशनकडून अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

विभाग

पुढील बातम्या