मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC: सौदी अरेबियानं अर्जेंटिनाला हरवलं, 'हे' आहेत फिफा वर्ल्डकपमधील सर्वात मोठे ५ अपसेट

FIFA WC: सौदी अरेबियानं अर्जेंटिनाला हरवलं, 'हे' आहेत फिफा वर्ल्डकपमधील सर्वात मोठे ५ अपसेट

Nov 23, 2022, 04:08 PM IST

  • biggest upsets of fifa world cup: फिफा वर्ल्डकपमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा धक्कादायक रित्या पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचा पुढचा मार्ग खडतर झाला आहे. मेस्सीच्या संघाला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

FIFA WC

biggest upsets of fifa world cup: फिफा वर्ल्डकपमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा धक्कादायक रित्या पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचा पुढचा मार्ग खडतर झाला आहे. मेस्सीच्या संघाला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

  • biggest upsets of fifa world cup: फिफा वर्ल्डकपमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा धक्कादायक रित्या पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचा पुढचा मार्ग खडतर झाला आहे. मेस्सीच्या संघाला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

फिफा विश्वचषकात (२२ नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियाने C ग्रुपमधील सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केला. फिफा वर्ल्डकपच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अपसेट असल्याचे मानले जात आहे. अर्जेंटिनाच्या पराभवाने फुटबॉल जगताला धक्का बसला आहे. पहिल्या हाफमध्ये लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी एकमेव गोल केला. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबियाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत दोन गोल केले आणि सामना जिंकला. सौदी अरेबियाच्या दोन्ही गोलमध्ये केवळ ५ मिनिटांचा फरक होता. अर्जेंटिनाविरुद्धच्या विजयाने सौदीने स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

फिफा वर्ल्डकपमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे उलटफेर

१९५० - यूएसए-१ - इंग्लंड-० (USA vs England)

१९५० मध्ये इंग्लंडने प्रथमच फिफा वर्ल्डकपमध्ये भाग घेतला होता. त्यावेळीदेखील इंग्लंड बलाढ्य संघ समजला होता. पण तुलनेने दुबळ्या अमेरिकेने त्यांचा पराभव केला. बेलो होरिझोंटेमध्ये झालेल्या सामन्यात जो गेटजेन्सने अमेरिकेसाठी एकमेव आणि विजयी गोल केला.

१९६६- उत्तर कोरिया-१ इटली-० (North Korea vs Italy)

१९६६ मध्ये उत्तर कोरियाने बलाढ्य इटलीच्या संघाचा १-० असा पराभव केला होता. कोरियाकडून पाक डु इकने एकमेव गोल केला. पराभवानंतर इटलीचा संघ मायदेशातील रोममध्ये पोहोचला त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी चिडून टोमॅटोने हल्ला केला होता.

१९८२- अल्जेरिया २ पश्चिम जर्मनी १ (Algeria vs Western Germany)

अल्जेरिया स्पेनमध्ये आपला पहिला विश्वचषक खेळत होता. अल्जेरियाला सर्वजण एक कमकुवत संघ म्हणून पाहत होते. पण अल्जेरियाने पश्चिम जर्मनीला २-१ ने धुळ चारली. अल्जेरियाकडून रबाह मझार आणि लखदार बेलौमी यांनी गोल केले. 

१९९०- कॅमेरून-१ अर्जेंटिना-० (Cameroon vs Argentina)

१९८६ चा वर्ल्डकप दिएगो मॅराडोनाच्या अर्जेंटिनाने जिंकला होता. ते १९९० च्या वर्ल्डकपमध्ये गतविजेते म्हणून पोहोचले होते. मात्र, या वर्ल्डकपमध्ये त्यांचा कॅमरुनसारख्या दुबळ्या संघाने पराभव केला. कॅमरूनकडून फ्रँकोइस ओमुम-बीकने विजयी गोल केला. त्या वर्ल्डकपमध्ये कॅमरुनचा संघ सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता.

२००२ - सेनेगल १ फ्रांस ० (Senegal vs France)

१९९८ मध्ये फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला होता. ते २००२ मध्ये गतविजेते म्हणून वर्ल्डकपमध्ये उतरले होते. पण या स्पर्धेत त्यांना पहिल्याच वर्ल्डकप खेळणाऱ्या सेनेगलने १-० ने पराभूत केले. सेनेगलकडून पापा बोउबा डियोप याने एकमेव गोल केला. यानंतर फ्रान्सचा संघ पहिल्याच फेरितून वर्ल्डकपमधून बाहेर पडली.

पुढील बातम्या