मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA World Cup: फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलचा खास प्लॅन, गोल केल्यानंतर ‘असं’ करणार सेलिब्रेशन

FIFA World Cup: फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलचा खास प्लॅन, गोल केल्यानंतर ‘असं’ करणार सेलिब्रेशन

Nov 23, 2022, 11:13 AM IST

    • Brazil football team will dance after each goals: फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलच्या खेळाडूंनी खास योजना आखल्या आहेत. त्यानुसार ते प्रत्येक गोल डान्स करून साजरा करतील. संघ आपला पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी सर्व खेळाडू उत्साहात आहेत.
Brazil football team

Brazil football team will dance after each goals: फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलच्या खेळाडूंनी खास योजना आखल्या आहेत. त्यानुसार ते प्रत्येक गोल डान्स करून साजरा करतील. संघ आपला पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी सर्व खेळाडू उत्साहात आहेत.

    • Brazil football team will dance after each goals: फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलच्या खेळाडूंनी खास योजना आखल्या आहेत. त्यानुसार ते प्रत्येक गोल डान्स करून साजरा करतील. संघ आपला पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी सर्व खेळाडू उत्साहात आहेत.

कतारमध्ये खेळल्या जाणार्‍या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये ब्राझीलचा संघ आपली ताकद दाखवण्यास सज्ज आहे. ब्राझीलने आतापर्यंत सर्वाधिक वेळा विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. यंदा सहावे वर्ल्डकप विजेतेपद पटकावण्यावर त्यांची नजर आहे. मात्र, ब्पाझीलला २००२ पासून एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. या विश्वचषकासाठी ब्राझीलला ग्रुप-G मध्ये ठेवण्यात आले असून त्यात कॅमेरून, स्वित्झर्लंड आणि सर्बिया या संघांचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलच्या खेळाडूंनी खास योजना आखल्या आहेत. त्यानुसार ते प्रत्येक गोल डान्स करून साजरा करतील. संघ आपला पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी सर्व खेळाडू उत्साहात आहेत. प्रत्येक गोल सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी एका विशेष डान्सची तयारी केली आहे. ब्राझीलचे खेळाडू या डान्सची रिहर्सलदेखील करत आहे. विशेष म्हणजे या सेलिब्रेशन डान्स स्टेप प्रत्येक गोलसाठी वेगळ्या असणार आहेत.

याबाबत ब्राझीलचा फॉरवर्ड राफिन्हा म्हणाला की, 'खरं सांगायचं तर आम्ही दहाव्या गोलपर्यंत आमच्या डान्स स्टेप्स तयार केल्या आहेत. दहाव्या गोलापर्यंत आम्ही प्रत्येक गोलसाठी वेगळा डान्स तयार केला आहे. जर आम्ही १० पेक्षा जास्त गोल केले तर आम्ही पुन्हा नवीन प्रकारचे नृत्य करू".

विशेष म्हणजे रिअल माद्रिदमध्ये आपल्या डान्समुळे विनिशियस ज्युनियर वादात सापडला होता. अशा डान्सवर स्पेनमध्ये प्रचंड टीका झाली होती. मात्र, विनिशियस आणि सहकारी रॉड्रिगोने गोल केल्यानंतर डान्स सेलिब्रेशन करणे सुरूच ठेवले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'आम्ही वर्ल्डकपमध्ये देखील आमच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना असे सेलिब्रेशन सुरूच ठेवू . यानंतर राफिन्हा आणि नेमार यांनीही विनिशियस ज्युनियरला जाहीरपणे पाठिंबा दिला होता.

पुढील बातम्या