मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashes 2023 : स्टीव्ह स्मिथ नॉट आऊट का? अंपायर नितीन मेननच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, MCC ने सांगितला नियम

Ashes 2023 : स्टीव्ह स्मिथ नॉट आऊट का? अंपायर नितीन मेननच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, MCC ने सांगितला नियम

Jul 29, 2023, 03:55 PM IST

    • Steve Smith Run Out Controversy : स्टीव्ह स्मिथला नॉट आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायर नितीन मेनन यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. या लाईफलाइनचा फायदा घेत स्मिथने ७१ धावांची शानदार खेळी केली.
england vs australia

Steve Smith Run Out Controversy : स्टीव्ह स्मिथला नॉट आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायर नितीन मेनन यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. या लाईफलाइनचा फायदा घेत स्मिथने ७१ धावांची शानदार खेळी केली.

    • Steve Smith Run Out Controversy : स्टीव्ह स्मिथला नॉट आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायर नितीन मेनन यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. या लाईफलाइनचा फायदा घेत स्मिथने ७१ धावांची शानदार खेळी केली.

Steve Smith Run Out Controversy : अ‍ॅशेस मालिका 2023 मध्ये थर्ड अंपायरचा आणखी एक निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. ओव्हल येथे अ‍ॅशेसच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावात स्टीव्ह स्मिथ थोडक्यात धावबाद होण्यापासून बचावला. थर्ड अंपायरने स्टीव्ह स्मिथला नॉटआऊट ठरवले. मात्र , थर्ड अंपायर नितीन मेनन यांच्या निर्णयावर इंग्लंडच्या समर्थकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडचा बदली क्षेत्ररक्षक मार्क एल्हॅमच्या थ्रोवर दुसरी धाव घेताना स्मिथची बॅट किंचित क्रीझच्या बाहेर होती. स्मिथपासून ते इंग्लंडचे खेळाडू आणि चाहते सर्वांनाच तो आऊट झाल्याचे वाटत होते, पण जेव्हा तिसरे पंच नितीन मेनन यांनी त्याला नाबाद दिले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

स्टीव्ह स्मिथला नॉट आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायर नितीन मेनन यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. या लाईफलाइनचा फायदा घेत स्मिथने ७१ धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला आणि इंग्लंड मोठी आघाडी मिळवता आली.

मात्र, दुसरीकडे क्रिकेटचे नियम बनवणारी संघटना मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) ने देखील स्मिथच्या या निर्णयाबाबत आपल्या वतीने ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. मेरीलेबोन क्रिकेट क्लबने या निर्णयाबद्दल ट्विट केले आणि सांगितले, की "जोपर्यंत बेल्स स्टंपवरून पूर्णपणे खाली पडत नाहीत किंवा स्टंप त्यांच्या जागेवरून हलत नाही तोपर्यंत खेळाडूला बाद दिले जाणार नाही. स्मिथच्या धावबाद निर्णयाच्या व्हिडिओमध्ये, बेअरस्टो चेंडूने स्टंप उडवत असताना, बेल्स पूर्णपणे हललेली नव्हती.

नितीन मेनन यांच्या निर्णयाचे अश्विनने कौतुक केले

नितीन मेनन यांनी दिलेल्या या निर्णयावर भारतीय संघाचा विद्यमान खेळाडू रविचंद्रन अश्विनने त्यांचे कौतुक केले आहे. अश्विनने ट्विटमध्ये लिहिले की, नितीन मेनन यांच्या योग्य निर्णयाचे कौतुक करावे लागेल. त्याचवेळी माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्रानेही नितीन मेननचे कौतुक केले आणि लिहिले की, नितीन मेनन चांगले केले. एक चांगला निर्णय. एक कठीण निर्णय".

पुढील बातम्या