मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Eng vs Aus Test : टेस्ट चॅम्पियन्ससमोर बझबॉलचं चॅलेंज, आजपासून पहिली कसोटी रंगणार

Eng vs Aus Test : टेस्ट चॅम्पियन्ससमोर बझबॉलचं चॅलेंज, आजपासून पहिली कसोटी रंगणार

Jun 16, 2023, 11:45 AM IST

    • ashes series 2023 : इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वात कसोटीत आक्रमक क्रिकेट खेळले आहे. या बझबॉल क्रिकेटच्या बळावरच त्यांनी गेले १७ पैकी १२ कसोटी सामने जिंकले आहेत.
ashes series 2023

ashes series 2023 : इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वात कसोटीत आक्रमक क्रिकेट खेळले आहे. या बझबॉल क्रिकेटच्या बळावरच त्यांनी गेले १७ पैकी १२ कसोटी सामने जिंकले आहेत.

    • ashes series 2023 : इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वात कसोटीत आक्रमक क्रिकेट खेळले आहे. या बझबॉल क्रिकेटच्या बळावरच त्यांनी गेले १७ पैकी १२ कसोटी सामने जिंकले आहेत.

eng vs aus test ashes series 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका अॅशेस सिरीजला आज शुक्रवार (१६ जून) पासून सुरुवात होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

इंग्लंडने नुकताच आयर्लंडविरुद्ध खेळला गेलेला एकमेव कसोटी सामना १० विकेट्सनी जिंकला, तर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव केला होता.

दरम्यान, इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वात कसोटीत आक्रमक क्रिकेट खेळले आहे. या बझबॉल क्रिकेटच्या बळावरच त्यांनी गेले १७ पैकी १२ कसोटी सामने जिंकले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने गेल्या वर्षभरात एकही मालिका गमावलेली नाही.

स्टोक्स आणि मॅक्युलम-

स्टोक्स आणि मॅक्युलमच्या जोडीपूर्वी इंग्लंडने १७ कसोटी सामने खेळले होते, ज्यामध्ये त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला होता. पण स्टोक्स आणि मॅक्युलम जोडीने इतिहास घडवला. इंग्लिश क्रिकेटर्स कसोटीतही आक्रमक खेळ करताना दिसत आहेत.

बझबॉलबाबत स्मिथ काय म्हणाला?

या बझबॉलबाबत बोलताना ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, इंग्लंडच्या फलंदाजांनी इतर संघांविरुद्ध खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्यांना आमच्या गोलंदाजांविरुद्ध खेळायचे आहे. इंग्लंडने गेल्या १२ महिन्यांत काही चांगले क्रिकेट खेळले आहे, आमच्या विरोधात कसे जाते हे पाहणे मनोरंजक असेल.

दोन्ही संघांचे रेकॉर्ड-

दोन्ही संघांमधील एकूण कसोटी सामने: ३५६

ऑस्ट्रेलिया विजयी : १५०

इंग्लंड विजयी : ११०

ड्रॉ : ९६

अॅशेस मालिका ७२ वेळा खेळली गेली आहे. ऑस्ट्रेलियाने ३४ वेळा अॅशेस मालिका जिंकली आहे. इंग्लंड संघाने ३२ वेळा मालिका जिंकली असून सहा मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

पुढील बातम्या