मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: 'उमरान १५० च्या स्पीडनं चेंडू टाकतो, आता नाही तर कधी खेळवणार?'

Umran Malik: 'उमरान १५० च्या स्पीडनं चेंडू टाकतो, आता नाही तर कधी खेळवणार?'

Sep 30, 2022, 01:08 PM IST

    • Dilip Vengsarkar on Umran Malik t20 world cup: उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीचे सगळेच चाहते आहेत. २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने खूप प्रभावित केले. २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने सतत १४५ ते १५० च्या स्पीडने गोलंदाजी करून फलंदाजांना त्रास दिला. यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात संधी दिली.
Umran Malik

Dilip Vengsarkar on Umran Malik t20 world cup: उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीचे सगळेच चाहते आहेत. २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने खूप प्रभावित केले. २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने सतत १४५ ते १५० च्या स्पीडने गोलंदाजी करून फलंदाजांना त्रास दिला. यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात संधी दिली.

    • Dilip Vengsarkar on Umran Malik t20 world cup: उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीचे सगळेच चाहते आहेत. २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने खूप प्रभावित केले. २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने सतत १४५ ते १५० च्या स्पीडने गोलंदाजी करून फलंदाजांना त्रास दिला. यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात संधी दिली.

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडिया च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह ऑस्ट्रेलियातील मेगा इव्हेंटमधून बाहेर पडला आहे. रवींद्र जडेजानंतर बुमराहही विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत आता बुमराहच्या जागी कोणकोण संघात स्थान निर्माण करू शकेल, अशा नावांची चर्चा क्रिकेट तज्ज्ञांनी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, यामध्ये भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनीही उडी घेतली आहे. वेंगसरकर यांनी उमरान मलिकचे नाव वर्ल्डकप संघासाठी सुचवले आहे.

वेंगसरकर काय म्हणाले

एका चॅनलशी संवाद साधताना वेंगसरकरांनी सांगितले की, “हा कोणताही आउट ऑफ द बॉक्स विचार नाही. उमरान मलिकला त्याच्या वेगामुळे मी संघात स्थान दिले असते. तो १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा खेळाडू आहे. तुम्हाला त्याला निवडावेच लागेल. त्याला आताच संधी दिली पाहिजे. कारण जेव्हा तो १३० kmph चा बॉलर होईल तेव्हा त्याला निवडून काही उपयोग होणार नाही". तसेच, आशिया चषकातही उमरानची निवड व्हायला हवी होती, असेही वेंगसरकर म्हणाले.

उमरान मलिक च्या वेगवान गोलंदाजीचे सगळेच चाहते आहेत. २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने खूप प्रभावित केले. २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने सतत १४५ ते १५० च्या स्पीडने गोलंदाजी करून फलंदाजांना त्रास दिला. यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात संधी दिली.

सध्या वेगवान गोलंदाजांची गरज

दरम्यान, वेंगसरकर पुढे म्हणाले की, “मला वाटते उमरान मलिकला आशिया चषक २०२२ च्या संघातही स्थान मिळायला हवे होते. दुबईत जिथे विकेट सपाट असते. अशा ठिकाणी तुम्हाला बाऊन्स मिळत नाही, तेथे स्पीड आवश्यक असते. अशा पीचेसवर मीडियम पेसर्सची प्रचंड धुलाई होती. अशावेळी तुम्हाला वेगाची आवश्यकता असते, जो आपल्या गतीने फलंदाजांना मात देऊ शकेल".

पुढील बातम्या