मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wimbledon Final 2023 : २० वर्षीय कार्लोस अल्कारेज विम्बल्डनचा नवा ‘किंग’, जोकोविचला हरवून जिंकले दूसरे ग्रँड स्लॅम

Wimbledon Final 2023 : २० वर्षीय कार्लोस अल्कारेज विम्बल्डनचा नवा ‘किंग’, जोकोविचला हरवून जिंकले दूसरे ग्रँड स्लॅम

Jul 16, 2023, 11:54 PM IST

  • Wimbledon 2023 mens single title : स्पेनच्या कार्लोस अल्कारेज विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२३ चा विजेता ठरला आहे. अत्यंत अटीतटीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अल्कारेजने नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

Carlos alcaraz

Wimbledon 2023 mens single title : स्पेनच्याकार्लोस अल्कारेज विम्बल्डन चॅम्पियनशिप२०२३ चा विजेता ठरला आहे. अत्यंत अटीतटीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अल्कारेजने नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

  • Wimbledon 2023 mens single title : स्पेनच्या कार्लोस अल्कारेज विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२३ चा विजेता ठरला आहे. अत्यंत अटीतटीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अल्कारेजने नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

स्पेनच्या कार्लोस अल्कारेजने विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२३ मध्ये पुरुष सिंगल्सचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी (१६ जुलै) रोजी लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अल्कारेजने दुसऱ्या नामांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याचा पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात १-६, ७-६ (६), ६-१, ३-६ व ६-४ ने पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

२० वर्षीय कार्लोस अल्कारेज यांच्या कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी अल्कारेजने मागच्या वर्षी नॉर्वेच्या कॅस्पर रूड याला पराभूत करून यूएस ओपन विजेतेपद मिळवले होते. दरम्यान नोवाक जोकोविच याचे २४ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

सामन्याचा पहिला सेट संपूर्णपणे जोकोविचच्या नावावर राहिला. त्याने स्पॅनिश खेळाडूला केवळ एक गेम जिंकण्याची संधी दिली. त्यानंतर अल्कारेजने दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागन करत सेट टायब्रेकरपर्यंत नेण्यात यशस्वी झाला. टायब्रेकरमध्ये अल्कारेजने नोव्हाकच्या चुकीचा फायदा घेत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर अल्कारेजने तिसरा सेट ६-१ असा जिंकला.

 

नोव्हाकही लवकर हार मानणारा खेळाडून नाही. त्यानेही चौथा सेट चिंकून सामना २-२ बरोबरीत आणला. पाचव्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये अल्कारेजने जोकोविचची सर्विस तोडली, जी अखेर निर्णायक ठरली.

कार्लोस अल्कारेजने सेमीफायनल मुकाबल्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवरती असणाऱ्या दानिल मेदवेदेव याला हरवले होते. अल्कारेजने मेदवेदेववर ६-३, ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता. दुसरीकडे नोवाक जोकोविचने सेमीफायनल सामन्यात आठव्या नामांकित इटलीच्या यानिक सिनरयाला ६-३ ६-४ व ७-६ ने मात देऊन अंतिम सामन्यात धडक दिली होती.

पुढील बातम्या