मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes : वनडे वर्ल्डकपसाठी बेन स्टोक्स निवृत्ती मागे घेणार? समोर आली महत्वाची अपडेट

Ben Stokes : वनडे वर्ल्डकपसाठी बेन स्टोक्स निवृत्ती मागे घेणार? समोर आली महत्वाची अपडेट

Aug 04, 2023, 05:03 PM IST

    • Ben Stokes World Cup 2023 : बेन स्टोक्स वनडे वर्ल्डकपसाठी निवृत्ती मागे घेऊ शकतो, अशी चर्चा इंग्लिश मीडियामध्ये सुरू आहे. पण आता स्टोक्सनेच या सर्व अफवा असून आपण वनडे फॉरमॅटमधून रिटायर राहणार असल्याचे सांगितले आहे.
Ben Stokes World Cup 2023

Ben Stokes World Cup 2023 : बेन स्टोक्स वनडे वर्ल्डकपसाठी निवृत्ती मागे घेऊ शकतो, अशी चर्चा इंग्लिश मीडियामध्ये सुरू आहे. पण आता स्टोक्सनेच या सर्व अफवा असून आपण वनडे फॉरमॅटमधून रिटायर राहणार असल्याचे सांगितले आहे.

    • Ben Stokes World Cup 2023 : बेन स्टोक्स वनडे वर्ल्डकपसाठी निवृत्ती मागे घेऊ शकतो, अशी चर्चा इंग्लिश मीडियामध्ये सुरू आहे. पण आता स्टोक्सनेच या सर्व अफवा असून आपण वनडे फॉरमॅटमधून रिटायर राहणार असल्याचे सांगितले आहे.

ben stokes for odi world cup 2023 : इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स विश्वचषकासाठी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती मागे घेऊ शकतो. स्टोक्सच्या पुनरागमनाबाबत इंग्लिश मीडियामध्ये सतत बातम्या येत आहेत की तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो आणि भारतात होणाऱ्या २०२३ च्या वनडे विश्वचषकासाठी निवडीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

स्टोक्सने जुलै २०२२ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकात इंग्लंडने विजेतेपद पटकावले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध संघासाठी शानदार खेळी केली होती. तेव्हापासून एकदिवसीय विश्वचषकात स्टोक्सच्या पुनरागमनाची चर्चा तीव्र झाली. मात्र, बेन स्टोक्सने त्याच्या वनडे पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, स्टोक्स गेल्या वर्षी म्हणाला होता की, "वर्ल्डकप दरम्यान मला कसे वाटेल यावर ते अवलंबून आहे. वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, ही एक अद्भुत गोष्ट आहे. पण सध्या मी त्याचा विचारही करत नाहीये."

तसेच, स्टोक्सने हेदेखील स्पप्ट केले आहे की, तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार नाही. याशिवाय अॅशेस 2023 नंतर तो सुट्टीवर जाणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. आयसीसीच्या हवाल्याने स्टोक्स म्हणाला की, "मी निवृत्त झालो आहे." "या सामन्यानंतर मी सुट्टीवर जाणार आहे ."

स्टोक्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त 

या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात स्टोक्सला गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर, तो आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी फक्त २ सामने खेळू शकला. त्याच वेळी, अॅशेस २०२३ च्या ४ कसोटींमधील दोन सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही.

पुढील बातम्या