
झिम-आफ्रो T10 लीगचा (zim afro t10 2023) १७ वा सामना डरबन कलंदर आणि हरारे हरिकेन्स यांच्यात झाला. या रोमहर्षक सामन्यात हरारे हरिकेन्सने डर्बन कलंदर्सचा २४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हरारेने १० षटकात १३४ धावा केल्या, प्रत्युत्तरात डर्बन कलंदरचा संघ १० षटकांत २ बाद ११० धावाच करू शकला. अशा प्रकारे हरारे हरिकेन्सने हा सामना २४ धावांनी जिंकला.
हरारे हरिकेन्ससाठी या सामन्यात रॉबिन उथप्पा हा खरा स्टार होता, त्याने २३ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५३ धावा केल्या. रॉबिन उथप्पाने या सामन्यात २३० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याला रेगिस चकाबवाने साथ दिली, त्याने २३ चेंडूंचा सामना करत ४३ धावा केल्या, त्याने आपल्या डावात ४ चौकार आणि ३ षटकार खेचले.
तत्पूर्वी, T10 2023 सामन्यात हरारे हरिकेन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हरारे हरिकेन्स संघाने १० षटकांत २ गडी गमावून १३४ धावा केल्या. संघासाठी रॉबिन उथप्पाने २३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावा केल्या. उथप्पाने केवळ चौकार षटरांच्या साह्यानेच ९ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याचवेळी डोनाव्हॉन फरेराने १२ चेंडूत नाबाद २४ धावांची खेळी केली.
याला प्रत्युत्तर म्हणून डरबन संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांना पहिला धक्का टिम सेफर्टच्या रूपाने बसला. यष्टिरक्षक फलंदाज सेफर्टने ६ चेंडूंत ८ धावा करून स्वस्तात विकेट गमावली. यानंतर आंद्रे फ्लेचर आणि हजरतुल्ला झाझाई यांच्यात ९२ धावांची भागीदारी झाली. फ्लेचरने २५ चेंडूत नाबाद ५० आणि झझाईने २८ चेंडूत ४९ धावा केल्या, मात्र हे दोन्ही फलंदाज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ल्यूक जोंगवेने २ बळी घेत संघाच्या हातून विजय हिसकावून घेतला.
संबंधित बातम्या
