मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup : टी २० वर्ल्ड कप साठी टीम इंडिया तैयार; नवी जर्सी झाली लॉन्च, BCCI ने शेयर केले फोटो

T20 World Cup : टी २० वर्ल्ड कप साठी टीम इंडिया तैयार; नवी जर्सी झाली लॉन्च, BCCI ने शेयर केले फोटो

Sep 18, 2022, 09:41 PM IST

    • T20 World Cup : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. यावेळी निळ्या रंगातील ही जर्सी असून वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ तयार झाला आहे.
भारतीय संघाची नवी जर्सी लॉन्च

T20 World Cup : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. यावेळी निळ्या रंगातील ही जर्सी असून वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ तयार झाला आहे.

    • T20 World Cup : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. यावेळी निळ्या रंगातील ही जर्सी असून वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ तयार झाला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आता पुढील महिन्यात होणाऱ्या ती २० वर्ल्ड कपसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया येथे ही स्पर्धा होणार असून या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. बीसीसीआईने रविवारी या मोठ्या सामन्यांसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लॉन्च केली. टी २० वर्ल्ड कपसाठी निवड समितिने सोमवारीच १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सध्या भारतीय संघ ज्या जर्सीमध्ये खेळते ती आकाशी रंगाची आहे. मात्र, टी २० वर्ल्ड कपसाठी तयार करण्यात आलेली नवी जर्सी ही निळ्या रंगाची आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाच्या जर्सीला बिलियन चीयर्स जर्सी असे नाव देण्यात आले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांवरून ही जर्सी प्रेरित होती. मात्र, या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ हा नव्या रंगात दिसणार आहे. या बाबतचे ट्विट बीसीसीआयने केले असून भारतीय क्रिकेट संघाच्या चंहत्यांसाठी आणली आहे निळ्या रंगातील नवी टी २० वन ब्लू जर्सी असे ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे.

रविवारी BCCI ने सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात नवी किट घातलेल्या खेळाडूंचा फोटो शेयर करण्यात आला आहे. या फोटोत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि महिला संघाची खेळाडू हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा, रेणुका सिंह यांनी ही नवी जर्सी परिधान केली आहे. नव्या जर्सीवर खांद्यावर गडद निळा रंग आहे. तर इतर किट ही हलक्या निळ्या रंगाची आहे. जर्सीच्या डाव्या बाजूला एक एक छोटे डिजाइन देखील काढण्यात आले आहे. यामुळे ही जर्सी आकर्षक आणि उठावदार दिसत आहे.

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर पासून १२ नोव्हेंबर पर्यन्त आईसीसी टी २० वर्ल्ड कप २०२२ पार पडणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा रविवारी २३ ऑक्टोबरला पाकिस्तान सोबत आहे. दोन्ही संघ हे ग्रुप २ मध्ये समाविष्ट आहेत. भारतीय संघाला पाकिस्ताननंतर साउथ अफ्रीका आणि बांग्लादेश सोबत आणखी दोन संघाशी खेळावे लागणार आहे. या बाबत ग्रुप स्टेजच्या सामन्यानंतर घोषणा होणार आहे. मुख्य संन्यापूर्वी भारतीय संघ हा दोन अभ्यास सामने खेळणार आहे.

 

पुढील बातम्या