मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson: वर्ल्डकप संघातून डच्चू; संजू सॅमसनच्या 'या' फोटोची प्रचंड चर्चा, पाहा

Sanju Samson: वर्ल्डकप संघातून डच्चू; संजू सॅमसनच्या 'या' फोटोची प्रचंड चर्चा, पाहा

Sep 12, 2022, 09:03 PM IST

    • T20 WC India Squad Sanju Samson viral photo: ICC T20 विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी (१२ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मेगा स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. सोमवारी दुपारी निवड समितीची बैठक झाली. यात १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आलीळ आहे.  या संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला नाही.
Sanju Samson

T20 WC India Squad Sanju Samson viral photo: ICC T20 विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी (१२ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मेगा स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. सोमवारी दुपारी निवड समितीची बैठक झाली. यात १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आलीळ आहे. या संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला नाही.

    • T20 WC India Squad Sanju Samson viral photo: ICC T20 विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी (१२ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मेगा स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. सोमवारी दुपारी निवड समितीची बैठक झाली. यात १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आलीळ आहे.  या संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे, तर जखमी रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोन यष्टीरक्षकांची निवड केली आहे. तर संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर संजूचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे.

विशेष म्हणजे, वर्ल्डकपसाठी संजूची संघात निवड न झाल्याने चाहतेही नाराज आहेत. संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२२ मध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता. तसेच, संजू सध्या चांंगल्या फॉर्ममध्ये आहे.

दरम्यान या व्हायरल झालेल्या फोटोत संजू मोबाईलमध्ये काहीतरी बघत आहे. यावर त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर “टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात तो त्याचे नाव शोधत असल्याचे म्हटले आहे,”

विशेष म्हणजे, क्रिकेट चाहते ऋषभ पंत आणि संजू सॅमसनची सतत तुलना करत असतात. यावेळी तशीच परिस्थिती आहे. ऋषभ पंतची आशिया चषकातील कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. असे असतानाही त्याची वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. त्यामुळे चाहते BCCI वर संतापले आहे.

सोबतच, पंत जेव्हा खराब कामगिरी करतो, तेव्हा संजू सोशल मीडियावर ट्विटरवर ट्रेंड होतो. अशीच परिस्थिती वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झाल्यानंतरही झाली आहे. संजू सॅमसन ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

ऋषभ पंत आणि संजू सॅमसनची आकडेवारी

ऋषभ पंतने आतापर्यंत ५७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अवघ्या २३.४३ च्या सरासरीने आणि १२६.२४ च्या स्ट्राइक रेटने ९१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसनने आतापर्यंत केवळ १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने २१.१४ च्या सरासरीने आणि १३५ च्या स्ट्राईक रेटने २९६ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनला ऋषभ पंत इतक्या संधी मिळालेल्या नाहीत. याचाही राग चाहत्यांच्या मनात आहे.

शमी आणि दीपक चहर राखीव खेळाडूंमध्ये

सोमवारी दुपारी निवड समितीची बैठक झाली. यात १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुलकडे असणार आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मुख्य संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकानंतर शमीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. त्याची आणि दीपक चहरची संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांचाही राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

पुढील बातम्या