मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Messi Photo on Currency: अर्जेंटिना सरकार करणार मेस्सीचा सन्मान, नोटांवर छापणार फोटो

Messi Photo on Currency: अर्जेंटिना सरकार करणार मेस्सीचा सन्मान, नोटांवर छापणार फोटो

Dec 24, 2022, 03:30 PM IST

    • lionel messi picture on currency note: मेस्सीने ३६ वर्षांनंतर आपल्या देशाला फिफा वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर अर्जेंटिना सरकार मेस्सीचा फोटो आपल्या देशाच्या चलनावर लावण्याचा विचार करत आहे. तेथील मीडिया रिपोर्ट्समध्ये अशा अनेक बातम्या व्हायरल होत आहेत.
Lionel Messi Photo on Currency

lionel messi picture on currency note: मेस्सीने ३६ वर्षांनंतर आपल्या देशाला फिफा वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर अर्जेंटिना सरकार मेस्सीचा फोटो आपल्या देशाच्या चलनावर लावण्याचा विचार करत आहे. तेथील मीडिया रिपोर्ट्समध्ये अशा अनेक बातम्या व्हायरल होत आहेत.

    • lionel messi picture on currency note: मेस्सीने ३६ वर्षांनंतर आपल्या देशाला फिफा वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर अर्जेंटिना सरकार मेस्सीचा फोटो आपल्या देशाच्या चलनावर लावण्याचा विचार करत आहे. तेथील मीडिया रिपोर्ट्समध्ये अशा अनेक बातम्या व्हायरल होत आहेत.

फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला. लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता. हा वर्ल्डकप जिंकल्यामुळे त्याच्या सोनेरी करिअरला चार चांद लागले आहेत. १८ डिसेंबरला झालेल्या फायनल सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर अर्जेंटिनासह जगभरात जल्लोषाचे वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

दरम्यान, अर्जेंटिना सरकार मेस्सीचा फोटो आपल्या देशाच्या चलनावर लावण्याचा विचार करत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. अशा अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अर्जेंटिना सेंट्रल बँकेने सरकारला तसा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये हजाराच्या नोटांवर मेस्सीचा फोटो लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

१९७८ मध्ये उत्सव म्हणून नाणी बनवण्यात आली होती

याआधी अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. अशा स्थितीत १९७८ च्या काळातही बँकेने विजयाचे स्मरण म्हणून नाणी जारी केली होती. अशा स्थितीत या वेळी बँक काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहे. अर्जेंटिनाच्या एल फायनान्सिएरो (El Financiero) या वृत्तपत्राने आपल्या रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे.

हजाराच्या नोटेवर मेस्सीचा फोटो?

या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, सेंट्रल बँक ऑफ अर्जेंटिनाकडे असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे १०००-पेसोच्या नोटेवर मेस्सीचा फोटो लावण्यात येईल. यामध्ये मेस्सीचा जर्सी नंबर-१० देखील दिसेल. हजार या संख्येतील पहिले दोन अंक १० असतील. तसेच या नोटेवर 'ला स्कॅलोनेटा' (La Scaloneta) हा शब्द असेल. हे अर्जेंटिनाचे संघाचे दुसरे नाव आहे.

पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिना विजयी

कतार येथे आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धेत लिओनेल मेस्सीने एकूण ७ गोल केले. अंतिम सामन्यात त्याने २ गोल केले. हे दोन्ही गोल २३व्या (पेनल्टी) आणि १०८व्या मिनिटाला झाले. अर्जेंटिनासाठी अँजेल डी मारियाने ३६व्या मिनिटाला गोल केला. अंतिम फेरीत किलियन एम्बाप्पेने फ्रान्ससाठी ३ गोल केले. अशाप्रकारे अतिरिक्त वेळेनंतरही सामना ३-३ असा बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना चॅम्पियन ठरला.

पुढील बातम्या