मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Cabinet Meeting: अयोध्येत दीपोत्सवाच्या आधी योगी कॅबिनेटची बैठक, कोणत्या प्रस्तावांना मिळणार मंजुरी?

Ayodhya Cabinet Meeting: अयोध्येत दीपोत्सवाच्या आधी योगी कॅबिनेटची बैठक, कोणत्या प्रस्तावांना मिळणार मंजुरी?

Nov 07, 2023, 05:07 PM IST

  • UP cabinet meeting : योगी कॅबिनेटची बैठक ९ नोव्हेंबर रोजी अयोध्येत होणार आहे. यामध्ये राम मंदिर उद्घाटन तसेच अन्य योजनांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Yogi Adityanath 

UPcabinet meeting : योगी कॅबिनेटची बैठक ९ नोव्हेंबर रोजी अयोध्येत होणार आहे. यामध्ये राम मंदिर उद्घाटन तसेच अन्य योजनांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

  • UP cabinet meeting : योगी कॅबिनेटची बैठक ९ नोव्हेंबर रोजी अयोध्येत होणार आहे. यामध्ये राम मंदिर उद्घाटन तसेच अन्य योजनांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Ayodhya Cabinet Meeting : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेत उत्तर प्रदेश सरकारची कॅबिनेट बैठक ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या येथील आंतरराष्ट्रीय कथा धाममध्ये होणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दीपोत्सवाच्या आधी ही बैठक होत आहेत. या कॅबिनेट बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही बैठक होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Viral News : पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवत होता १७ वर्षीय रॅपर, गोळी झाडली गेल्याने अचानक मृत्यू

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

कॅबिनेट बैठकीचा अजेंडा बुधवारपर्यंत जारी करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारासाठी यूपी सरकारमधील अनेक मंत्री गेले आहेत. त्यांनाही या बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

ही पहिलीच वेळ नाही की, लखनौच्या बाहेर मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे. २०१९ मध्ये कुंभ मेळाव्याच्या दरम्यान योगी कॅबिनेट प्रयागराजमध्ये पार पडली होती. त्या बैठकीत कॅबिनेटने मेरठ ते प्रयागराजपर्यंत गंगा एक्सप्रेस वे योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सूत्रांचे म्हणणे आहे की, आगामी काळात योगी कॅबिनेटची बैठक वाराणसी आणि मथुरा येथेही होऊ शकते. 

९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासह अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकते. त्याचबरोबर उत्तर प्रदेश अंतर्देशीय जल मार्ग प्राधिकरण गठन करण्यास मंजूरीही मिळू शकते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. प्रचार सभेत ते राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत. भाजपाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चार राज्यात पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले आहे.

पुढील बातम्या