मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Covid-19 Bioweapon : कोरोना विषाणू हे चीनचे 'जैविक शस्त्र', वुहानच्या संशोधकाचा धक्कादायक खुलासा

Covid-19 Bioweapon : कोरोना विषाणू हे चीनचे 'जैविक शस्त्र', वुहानच्या संशोधकाचा धक्कादायक खुलासा

Jun 29, 2023, 11:04 AM IST

    • China Covid-19 Bioweapon : जगभरात लाखों लोकांचे बळी घेणारा कोरोना विषाणू हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचा धक्कादायक खुलासा वूहानच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे. या पूर्वी अमेरिकेने सातत्याने हे आरोप चीन वर केले आहे.
China Covid-19 Bioweapon

China Covid-19 Bioweapon : जगभरात लाखों लोकांचे बळी घेणारा कोरोना विषाणू हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचा धक्कादायक खुलासा वूहानच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे. या पूर्वी अमेरिकेने सातत्याने हे आरोप चीन वर केले आहे.

    • China Covid-19 Bioweapon : जगभरात लाखों लोकांचे बळी घेणारा कोरोना विषाणू हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचा धक्कादायक खुलासा वूहानच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे. या पूर्वी अमेरिकेने सातत्याने हे आरोप चीन वर केले आहे.

China Spread Covid 19 : जगभरात लाखों नागरिकांचे बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूचे वास्तव आता पुढे आले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ति आहे असा आरोप होत होता. अमेरिकेने हा चीनी विषाणू असल्याचा दावा करत चीनच्या वूहानच्या प्रयोग शाळेच्या तपासणीची मागणी केली होती. मात्र, चीनने हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, चीनच्याच एका शास्त्रज्ञाने हा विषाणू चीनने तयार केला असून हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचा दावा देखील या शास्त्रज्ञाने केला आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे संशोधक चाओ शान असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending news : प्रेमासाठी कायपण! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जुळले सूत!

Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं धरलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check : अखिलेश यादव यांच्यावर रोड शो दरम्यान बूट व चप्पला फेकल्या की हार अन् फुले?

Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण

Agniveer recruitment : लष्करी सेवेची तरुणांना संधी; संभाजीनगरमध्ये अग्निवीर भरती मेळावा

कोरोनामुळे जगात मृत्यूचे थैमान घातले होते. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या डबघाईला आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊन मुळे सर्व बंद झाले होते. अनेक नागरिक हे आपल्या घरापासून दूर अडकून पडले होते. दरम्यान, हा विषाणू चीन मधून सर्व जगात पसरल्याने चीनने जाणीव पूर्वक अनेक देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या करण्यासाठी या विषणूचा वापर केला असा दावा चीनच्याच शास्त्रज्ञाने केला आहे.

Pune Police : कोयता हल्ल्यानंतर पुणे पोलिसांना जाग; पोलीस आयुक्तांनी घेतले अनेक मोठे निर्णय

हा संशोधक वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतील काम करतो. त्याने केलेल्या दाव्यानुसार लोकांना जाणीवपूर्वक संक्रमित करण्यासाठी कोविड १९ नामक विषाणूचे चीनने 'बायोवेपण केले. हा विषाणू चीनने 'जैविक अस्त्र' म्हणून तयार केला होता आणि त्याच्या सहकाऱ्यांना विषाणूचे चार प्रकार देण्यात आले. यामधील घातक असलेला कोरोना विषाणू अधिक वेगाने पसरू असा दावा देखील या शास्त्रज्ञाने केला आहे.

जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणूचा प्रभाव आता कुठे कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या विषाणूचे मुळ नेमके कुठले आहे याचा शोध जगभरातील यंत्रणा घेत आहेत. दरम्यान, हा विषाणू चीनने पासरवल्याचा आरोप हा अनेक देश करत होते. त्यात चीनच्या शास्त्रज्ञाने हा दावा केल्याने आता चीनची पोल खोल झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना चे मूळ शोधण्यासाठी एक टीम चीनला पाठवली. मात्र, चीनने सर्व आरोप फेटाळून लावले होते.

विभाग

पुढील बातम्या